धार्मिक

श्री संत बाळूमामा भंडारा उत्सव भोसे गावात उत्साहात साजरा

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री संत बाळूमामा यांचा भंडारा उत्सव भोसे येथे मंगळवार दि. १७ सप्टेंबर रोजी भक्तीमय वातावरणात गुरूवर्य सद्गुरु श्री मनोहर मामांच्या कृपाआशीर्वादाने श्री संत बाळूमामा प्रतिष्ठान भोसे-चखालेवाडीच्या वतीने साजरा करण्यात आला. भोसे येथे श्री संत बाळूमामा मेंढी माऊली समाधी मंदिर असून येथे दरवर्षी भोसे गावातील तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ भाविक भक्तांच्या आणि बाळूमामा प्रतिष्ठानच्या नियोजनातून भंडारा उत्सवा निम्मित विविध अध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याचाच एक भाग म्हणून सरकारच्या एक गाव एक गणपती या संकल्पनेतून प्रतिष्ठानच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षीही गणपती बाप्पांची मुर्ती बसवण्यात आली होती. भंडारा उत्सव व गणपती विसर्जन निमित्त प्रतिष्ठानच्या वतीने आणि प्रगतशील शेतकरी आबा खराडे यांच्या पुढाकारातून गायनाचार्य हभप विजय महाराज नेहरे (चिंचपुरकर) यांचे जाहिर असे श्रवणीय हरी किर्तन पार पडले. यावेळी महाराजांना सुंदर अशी साथ ज्ञानाई गुरूकुल वारकरी शिक्षण संस्था पिंपळवाडी येथील छोटे वारकरी तसेच भोसे गावचे हभप प्रसाद सुडके महाराज, हभप शुभम महाराज शिंदे यांनी देत बाळूमामांच्या नावानं चांगभलं, मनोहर मामांच्या नावानं चांगभलंच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. तदनंतर आरती होऊन उत्सवाची सांगता महाप्रसादाने करण्यात आली.
तसेच महराष्ट्रातील पारंपरिक गजे ढोल खेळाचेही अयोजन करण्यात आले होते. राजमाता ग्रुप रुईखेल श्रीगोंदा यांच्या वतीने गजे खेळाचे सादरीकरण वाजत गाजत करण्यात आले. याप्रसंगी भक्तीमय वातावरणात श्री संत बाळूमामांच्या मूर्तीची विधीवत पूजा,अभिषेक करण्यात आला. गणपती विसर्जन निम्मित सत्यनारायण महापूजा केल्यानंतर विसर्जन मिरवणुकीमध्ये फटाक्यांची आतिषबाजी गुलालाची उधळण करत वाजत गाजत लाडक्या गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. यावेळी भोसे गावचे माजी सरपंच निळकंठ खराडे, कर्जत तालुका दुध संघाचे संचालक दादासाहेब खराडे, शालेय शिक्षण समिती भावडी अध्यक्ष भाऊसाहेब कोरडकर, सामाजिक कार्यकर्ते शहाजी खराडे साहेब, नितिन भोसले, जिल्हा कार्यकारणी सदस्य किसान मोर्चा प्रदिप खराडे,पोलीस पाटील मधुकर चव्हाण,माजी सरपंच राजेंद्र ढोले, दादा पांडूळे,बाबासाहेब ढोले,शिवाजी खराडे तसेच बाळूमामांच्या मंदिर परिसराच्या जीर्णोद्धाराच्या प्रत्येक कार्यात सहभागी असणारे सामाजिक कार्यकर्ते लतिफ बशीर शेख, प्रसिद्ध व्यापारी आदमभाई शेख, ईस्मालभाई शेख, दादासाहेब शिंगाडे तसेच पंचक्रोशीतील भाविक भक्त परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. मनीषा साऊंड सिस्टीमचे संचालक, ग्रामपंचायत सदस्य परशुराम ढोले यांनी साऊंड सिस्टीम उपलब्ध करून दिली तसेच भाविकांना पिण्याच्या पाण्याची विनामूल्य सोय प्रवीण साबळे यांनी करून दिली.
कार्यक्रम आयोजनासाठी यशस्वी करण्यासाठी किशोर खराडे, विक्रम खराडे,वैभव दुधाने,उमेश क्षिरसागर,मयुर खराडे,संग्राम क्षीरसागर,रमेश राऊत, भाऊसाहेब राऊत,सतीश साळुंके,युवराज क्षीरसागर,संकेत क्षीरसागर,राहुल ढोले,आण्णा खराडे,मोहित खराडे, सागर शिंगाडे, स्वप्नील विपट,सुनील ढोले,रोहन खराडे,अक्षय खराडे,अभिषेक ढोले, बाळू काटे,ऋतुज ढोले,राहुल काटे,प्रज्वल क्षीरसागर,अक्षय चव्हाण,सार्थक चव्हाण, साहिल ढोले,प्रणव खराडे,योगेश ढोले,विराज विपट,ओंकार अनुभुले,चैतन्य धावड, चव्हाण शिंदे खराडे राऊत क्षीरसागर ढोले परिवारातील युवकांनी विशेष परिश्रम घेतले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे