पंडीत दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे 23 ते 27 डिसेंबर दरम्यान आयोजन
अहमदनगर दि. 22 डिसेंबर :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अहमदनगर कार्यालयामार्फत जिल्ह्यातील उमेदवारांना विविध क्षेत्रात नव्याने निर्माण होत असलेल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्यादृष्टीने दिनांक 23 ते 27 डिसेंबर 2022 या कालावधीत पंडीत दीन दयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in/ या संकेतस्थळावर करण्यात आले असून इच्छुक उमेदवारांनी नोंदणी प्रक्रिया पुर्ण करून रोजगाराच्या या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अहमदनगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर आपली नाव नोंदणी करून व ज्यांची नाव नोंदणी झालेली आहे त्यांनी लॉगीन करुन पात्रतेनुसार उद्योजकाकडे अप्लाय करावे व ऑनलाईन पद्धतीने या रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे. याबाबत अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक ०२४१-२९९५७३५ किंवा रोजगार मेळावा समन्वयक स्वप्नील ठाणगे मो. नं. ९८२२१८१११४ व संतोष वाघ मो. नं. ८८३०२१३९७६ यांच्याशी संपर्क साधावा, असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.