गुन्हेगारी

कोतवाली पोलिसांनी आवळल्या दिवसा ढवळ्या घरफोडी करणाऱ्या टोळी प्रमुखाच्या मुसक्या!

६ तोळे सोने व ९२० ग्रॅम वजनाची चांदी असे एकूण २ लाख ४२ हजार ६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल कोतवाली पोलिसांच्या ताब्यात!

.

अहमदनगर दि.२४ मे ( प्रतिनिधी) शहरातील कोतवाली पोलीसांना दिवसा ढवळ्या घरफोडी करणाऱ्या टोळी प्रमुखाच्या मुसक्या आवळण्यात यश आले आहे.
कोतवाली जेरबंद केलेल्या म्होरक्याकडून ६ तोळे सोने व ९२० ग्रॅम वजनाची चांदी असे एकूण २ लाख ४२ हजार ६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.२१ मे रोजी सकाळी पहाटे ४.३० वा सुमारास आई वडिलांसह देवदर्शानकरीता राहत्या घरास कुलूप लावून जेजुरी येथे गेलो,या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने बंद घराचे कुलूप तोडून आमच्या घरात प्रवेश करून उचका-पाचक केली.गोदरेज कपाटातील सोन्या-चांदीचे ३ लाख ३ हजार १०० रुपये किंमतीचे दागिने स्वताःच्या आर्थिक फायद्याकरीता चोरून नेले,या पूजा मनोज बडे (रा भुषननगर केडगाव अहमदनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुरनं। ३९४/२०२२ भादवि कलम ४५४,४५७,३८० प्रमाणे गुन्हा रजि दाखल करण्यात आला आहे.या गुन्ह्याचा तपास करत असतांना पोनि.संपतराव शिंदे यांना सदरील गुन्हा हा फिर्यादी यांच्यावर पाळत ठेवून झालेला आहे.घराची माहीती देणारे आरोपी हे अहमदनगर येथील असून घरफोडी करणारे आरोपी हे पुणे येथून आलेले होते,अशी प्राथमिक माहीती मिळाली. या माहितीवरून श्री.पोनि.शिंदे यांनी आरोपींचा शोध घेणे कामी गुन्हे शोध पथकाचे एक पथक पुणे येथे व दुसरे पथक कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत रवाना केले. आरोपींचा शोध घेत असतांना एकजण गुन्ह्यातील चोरीस गेलेला सोने चांदीचा मुद्देमाल विक्री करण्याकरीता गंजबाजार येथे येणार असल्याबाबत माहीती मिळाली. त्यानुसार सापळा लावून एक इसम संशयीतरित्या सोने व चांदी विक्री करण्याकामी सराफ बाजारात फिरताना मिळून आला.त्यास पोलीस पथकाच्या मदतीने ताब्यात घेऊन त्याला विचारपूस केली,त्याने त्याचे नाव अविनाश दिलीप क्षेत्रे राहणार भूषण नगर केडगाव अ.नगर असे सांगितले.त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे सोन्या-चांदीचे दागिणे मिळून आले.दागिण्या बाबत त्याच्याकडे चौकशी करता त्यांने व त्याचे साथीदार यांनी मिळून केडगाव भूषणनगर येथे घरफोडी केल्याचे कबुली दिली.त्याला गुन्हा करते वेळी पुणे येथील आरोपी साथीदार होते.
असे त्याने सांगितले आहे.त्याच्या साथीदाराबाबत पोलिसांनी माहीती घेतली असून त्यांचा पोलिस शोध घेत आहेत.जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील,अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, नगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवालीचे पोनि. संपतराव शिंदे यांच्या सूचनेनुसार सपोनि/रविंद्र पिंगळे व गुन्हे शोध पथकाचे पोना/गणेश धोत्रे,पोना/योगेश भिंगारदिवे,पोना/योगेश कवाष्टे,पोकॉ/अभय कदम,पोकॉ/ दिपक रोहकले,पोकाँ/सुजय हिवाळे,पोकाँ/तानाजी पवार, पोकॉ/अमोल गाढे,पोकॉ/सोमनाथ राऊत,पोकॉ/अतुल काजळे,पोना/मोहन भेटे,पोना/नकुल टिपरे,पोकाँ/प्रशांत राठोड,पोकाँ/राहुल गुंडु,मपोकाँ/वसुधा भगत,मपोकाँ/ छाया गायकवाड आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे