अहमदनगर शहरामध्ये शहर वाहतुक नियंत्रण शाखा, अहमदनगर या शाखेमार्फत शहरातील वाहतुकीचे नियमन व नाकाबंदी करणेकामी विविध चौकात पोलीस अधिकारी व अंमलदार नेमण्यात येतात. दि.०४/०९/२०२४ रोजी शहर वाहतुक शाखेमार्फत कोठला स्टॅण्ड अहमदनगर या ठिकाणी नाकाबंदी नेमली असता पोनि बाबासाहेब बोरसे, शहर वाहतुक शाखा, अहमदनगर यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, अहमदनगर शहरातील कोठला, मंगलगेट या ठिकाणी महाराष्ट्रातुन कोठुणतरी गोवंश जातीची जनावरे कत्तल करुन मांस विक्री करण्याचे उद्देशाने जनावरांना मालवाहतुक वाहनातुन डांबून ठेवुन चारापाण्याची कोणतीही व्यवस्था न करता छ. संभाजीनगर रोडने घेवुन येत आहेत. अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने पोनि/बाबासाहेब बोरसे, श्रेणी पोसई/शमुवेल गायकवाड, सफौ/मन्सुर सय्यद, पोकों/युवराज गव्हाणे, पोशि/मधुकर ससे, चापोशि/अतुल लगड तसेच तोफखाना पोलीस स्टेशनचे पोहवा/विनोद गंगावणे, पोहवा/दिपक जाधव, पोकॉ/सचिन बाचकर, पोकों/सावळेराम क्षिरसागर यांना दि.०४/०९/२०२४ रोजी सकाळी ०६/०० वा. शिरुर बाजुकडुन कोठला स्टॅण्डचे दिशेने येणारी चार संशयित मालवाहतुक वाहने दिसली. सदर वाहने थांबवुन चौकशी केली असता त्यांनी उडवाउडविची उत्तरे दिल्याने वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये ५ काळया रंगाच्य जर्शी गायी, गोवंश जातीची ६१ लहान-मोठी जर्शी वासरे मिळुन आली. सदर वाहन चालकांची चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे- १) वसीम इसाक सय्यद रा. खाटीकगल्ली, अहमदनगर (महींद्रा पिकअप क्र. एमएच. १७ एजी. ३२५१) २) आतिक लतीफ कुरेशी रा. राहुरी, अहमदनगर (महींद्रा पिकअप क्र. एमएच.०१ एल.ए.३४२३) ३) सुलतान एनुद्दीन कुरेशी रा. इस्लामुपुरा मदारी वस्ती, शिरुर जि.पुणे (महींद्रा पिकअप क्र. एमएच.४२ एम. २९७८) ४) जमील अब्दुल सय्यद रा. कोठला, घासगल्ली, अहमदनगर (सुझुकी कंपनीची कॅरी-विना नंबरची) अशी असल्याचे समजले. नमुद इसमांकडुन एकूण ११,४६,०००/- रु एवढा मुद्देमाल पंचासमक्ष पंचनामा करुन जप्त करण्यात आला असुन त्यांचेविरुद्ध सफी/मन्सुर सय्यद यांनी तोफखाना पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम. ११, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ चे कलम ५ (ब),९ मोटार
वाहन कायदा कलम.६६(१), १९२,१५८/१७७ प्रमाणे फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोना/ विनोद गंगावणे तोफखाना पोलीस ठाणे हे करित आहेत. सदरची कारवाई ही राकेश ओला (भापोसे,) पोलीस अधीक्षक साो. अहमदनगर, प्रशांत सौरे, अपर
पोलीस अधीक्षक सो. अहमदनगर, अमोल भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी सो. नगर शहर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली कोठला स्टॅण्ड अहमदनगर या ठिकाणी करण्यात आली आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा