जामखेड कला केंद्रावरील लेडीज डान्स बार डीजे चा वापर बंद करून लोक कलावंतांना संधी मिळणे बाबत निवेदन!

जामखेड दि. 21 मार्च ( प्रतिनिधी रोहित राजगुरू) जामखेड या ठिकाणी 9 सांस्कृतिक केंद्र आहेत. या केंद्रावरती पारंपारिक पद्धतीने पूर्वीपासून लोककला सादर केली जात होती. यामध्ये नऊवारी साडीतील नर्तिकेचा डान्स तबला व पेटीच्या सुमधुर गीतावर थिरकला जात होता., आणि त्यास प्रेक्षकही मंत्रमुग्ध होऊन प्रतिसाद देत होते., परंतु सद्यपरिस्थितीत हे तबला आणि पेटी वादक या पारंपारिक लोक कलावंतांना या थेटर मालकाने कामावरून कमी आहे. त्या ऐवजी सांस्कृतिक कलाकेंद्र याठिकाणी मोठमोठे होम थिएटर बसूवून डीजे सारख्या कर्ण कर्कश अशा आवाजात गाणी सादर केली जातात. त्यामुळे या कमी केलेल्या कलावंतावर उपासमारीची वेळ आलेली आहे. तरी शासनाने व जामखेड तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने जामखेड मधील नऊ सांस्कृतिक कला केंद्र चालकांना कला केंद्र चालवताना पारंपारिक वाद्यावरच कला सादर करण्यात यावी. तसेच महाराष्ट्राची संस्कृती लावणी हा अविष्कार जपण्यात यावा. अशा पद्धतीचे निवेदन दिनांक 19 मार्च 2024 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष सुनील साळवे यांच्या नेतृत्वाखाली व जामखेड तालुक्यातील सर्व लोक कलावंताच्या उपस्थितीत आज देण्यात आले. यावेळी जामखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश पाटील व तहसीलदार गणेश माळी यांनी निवेदन कर्त्याना आश्वासित करून तुमच्यावर अन्याय होणार नाही योग्य ती चौकशी करून उचित कारवाई करू असे आश्वासन यावेळी अधिकाऱ्यांनी दिले. सध्या कला केंद्रावर होत असलेल्या मनमानी कारभाराच्या विरोधात जामखेड तालुक्यातील सर्व लोक कलाकार एक वटलेले पाहायला मिळाले. यावेळी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे,कला केंद्राचे तबलावादक युवराज गायकवाड, छबू (नाना) गायकवाड, तसेच रिपाईचे कार्याध्यक्ष सतीश साळवे ,बापू जावळे,शिवाजी अंधारे,विनोद काळे, अजहर खान,अशिम खान, आंबादाश शिंदे,गंगाराम वाघमारे,अंकुश पुलवले,विशाल तोरणे,अमोल जाधव,आरिफ खान,आशिफ खान,दीपक जोगदंड,विजय पुलावळे,श्रीराम सदाफुले,आदी बहुसंख्येने लोक कलावंत उपस्थित होते.
आठ दिवसात उचित व योग्य तो निर्णय न झाल्यास सर्व कलाकारांनी उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.त्यामुळे जामखेड तालुक्यातील कला केंद्राचे चालक मालक काय निर्णय घेतात,लोक कलावंताच्या हाताला काम देणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.