सामाजिक
देशस्तंभ न्यूज नेटवर्कच्या मिरजगाव वार्ताहरपदी सामजिक कार्यकर्ते संकेत घोडके यांची निवड!

अहमदनगर (प्रतिनिधी) कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील सामजिक कार्यकर्ते संकेत बाबासाहेब घोडके यांच्या सामजिक कार्याची आवड लक्षात घेऊन त्यांना देशस्तंभ न्यूज नेटवर्कच्या मिरजगाव वार्ताहरपदी काम करण्याची संधी देशस्तंभ न्यूज नेटवर्कचे संस्थापक संपादक महेश भोसले यांनी सोपविली आहे.त्यांच्या या निवडीबाबत उपसंपादक सुरेश भिंगारदिवे,जिल्हा प्रतिनिधी गौतमी भिंगारदिवे, कोंभली सर्कल प्रतिनिधी दिपक गावडे, कौडाने प्रतिनिधी,संभाजी शिंगाडे,चांदे खुर्द चे वार्ताहर अमोल गंगावणे तसेच कर्जत तालुक्यातील मित्रपरिवाराने व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.