रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) अहमदनगर पक्षाच्यावतीने संविधान दिन उत्साहात साजरा

अहमदनगर-(दि.२६ नोव्हेंबर) भारतीय संविधान दिनानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला.सर्वप्रथम भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्यास उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.*यावेळी अहमदनगर जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांनी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे/उद्देशिकाचे वाचन करून आपले मनोगत व्यक्त केले.* ते म्हणाले भारतीय संविधान निर्माण करत असताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.भारत देशामध्ये विविध जातीचे,पंथाचे,धर्माचे,बोली भाषेचे लोक राहतात. या सर्वांना एकत्र जोडण्याचे काम फक्त भारतीय संविधानाने केले. त्यामुळेच विविध समाजाला गुण्यागोविंदाने जगण्याची संधी मिळावी म्हणून भारतीय संविधान हे लोकशाही मार्गाने स्वीकारण्यात आले.आणि आज संपूर्ण भारतीय नागरिक संविधानाच्या जोरावर,संविधानाच्या ताकतीवर आपले हक्क आणि न्यायासाठी लढू शकतो असे प्रतिपादन सुनील साळवे यांनी केले.यावेळी जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे,शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे,युवक जिल्हाध्यक्ष विवेक भिंगारदिवे,नगर तालुकाध्यक्ष आविनाश भोसले,बौद्धाचार्य संजय कांबळे,महिला जिल्हाध्यक्ष आरती बडेकर,शितल घोडके,शहर जिल्हा उपाध्यक्ष योगेश त्रिभुवन, शहर उपाध्यक्ष प्रतिक नरवडे,नगर तालुका उपाध्यक्ष विशाल कदम,पवन भिंगारदिवे,वैभव जाधव,सिद्धांत दाभाडे,मायाभाई कांबळे,संदिप तुपारे,आर.बी.रंधवे,सचिन कांबळे,प्रदिप बोराटे,बापु जावळे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.