जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीची त्रुटी पूर्ततेसाठी विशेष मोहीम

*अहमदनगर, दि.१४ मार्च (प्रतिनिधी)अहमदनगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने त्रुटीपूर्तते अभावी प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी १६ ते १८ मार्च २०२२ या कालावधीत ‘विशेष त्रूटी पुर्तता मोहीम’ राबविण्यात येणार आहे. अशी माहिती समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी (निवड श्रेणी) विकास पानसरे यांनी दिली आहे.
सन २०२२- २०२३ या शैक्षणिक वर्षातील १२ वी विज्ञान शाखेतील प्रवेशीत व पदविका अंतिम वर्ष शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणी अर्ज समितीकडे त्यांच्या शैक्षणिक संस्थेच्या शिफारसीसह विहीत मुदतीत सादर करणे आवश्यक आहे. तसेच आगामी शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र मिळणे आवश्यक आहे. यास्तव समिती कार्यालयाकडे ज्या अर्जदारांनी जात वैधता प्रमाणपत्रा करीता अर्ज केले आहेत परंतु वाजवी त्रुटी अभावी ज्यांचे अर्ज प्रलंबित आहेत अशा अर्जदारांकरीता ही विशेष त्रुटीपुर्तता मोहिम आयोजीत करण्यात आली आहे.
या विशेष मोहिमेतील दिवशी सकाळी १० ते ६ पर्यंत अहमदनगर जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सावेडी नाका , अहमदनगर या ठिकाणी आवश्यक कागदपत्रेसह प्रत्यक्ष उपस्थित राहावे. असे आवाहन समिती सदस्य तथा उपायुक्त अमीना शेख आणि सदस्य सचिव तथा संशोधन अधिकारी भाऊ खरे यांनी केले आहे.