ब्रेकिंग

पैशांच्या व्यवहारातून एकाचे अपहरण व मारहाण! भिंगार कॅम्प पोलीसांनी केली अपहरणीत व्यक्तीची 1 तासात सुखरूप सुटका! एका अपहरण कर्ता अटक!

अहमदनगर दि.३ डिसेंबर (प्रतिनिधी)पैशांच्या व्यवहारातून एकाचे अपहरण व मारहाण करणाऱ्यास
भिंगार कॅम्प पोलीसांनी केली अपहरणीत व्यक्तीची 1 तासात सुखरूप सुटका करण्यात भिंगार पोलिसांना यश आले असून या कारवाईत एकाला अटक करण्यात आल्याची माहिती भिंगार पोलिसांकडून मिळाली आहे. या कारवाईची सविस्तर माहिती अशी की,
दि.01/12/2022 रोजी भिंगार कॅम्प पो स्टे ला माहीती मिळाली कि, आलमगीर परीसरातून एका व्यक्तीला काही इसमांनी अपहरण करून घेऊन गेले आहे अशी माहीती मिळताच भिंगार कॅम्प पो स्टे चे सपोनी श्री. शिशिरकुमार देशमुख यांनी भिंगार कॅम्प पोस्टे मधील अधिकारी व अंमलदार यांना सदर अपहरण कर्त्याला व अपहरण करण्यात आलेल्या इसमाचा शोध घेणे कामी रवाना केले. गोपनीय माहीतीद्वारे अपहरणीत व्यक्ती हा वडारवाडी, भिंगार येथे एका खोलीत डांबून ठेवला आहे अशी माहीती मिळाल्याने तसेच तांत्रीक विश्लेशनाच्या आधारे भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे पथक वडारवाडी, भिंगार येथे जावून खात्री केली असता दोन इसम हे वडारवाडी, भिंगार येथे मिळून आलेने त्यामधील एकाने सांगीतले कि, माझे नाव सोहेल अथर हुसैन बोहरी वय 33 वर्षे रा. फुलारी टॉवर जवळ, आलमगीर ता.जि. अहमदनगर असे असून या व्यक्तीने व याचे सोबत असलेलाय इतर लोकांनी माझ्या घरी येऊन मी त्यांचे कडून उसने घेतलेले पैसे माझ्याकडे आता नाही, माझ्या कडे पैसे आल्यावर मी देतो असे सांगून सुद्धा यांनी मला तसेच माझ्या घरच्यांना लाथाबुक्याने मारहाण करून मला बळजबरीने रिक्षा मधून घेऊन वडारवाडी, भिंगार येथील एका खोलीत डांबून ठेऊन मला मारहाण केली आहे. तसेच त्यांनी माझ्या कडे असलेला माझा कार्बन कंपनीचा मोबाईल व माझे ए टी एम माझ्या कडून बळजबरीने काढून घेतले आहे असे सांगीतलेने पोलीस पथकाने सदर दोन्ही इसमांना ताब्यात घेऊन भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनला आणून अथर हुसैन बोहरी वय 33 वर्षे रा. फुलारी टॉवर जवळ, आलमगीर ता. जि. अहमदनगर यांचे फिर्यादीवरून 1. अंजुम बाबासाहेब सय्यद 2. फैजान जहागिरदार 3. अश्पाक बाबसाहेब सय्यद 4. इरशाद बाबासाहेब सय्यद वय 39 वर्षे रा. मोमीन गल्ली, भिंगार ता. जि. अहमदनगर व एक अनोळखी इसम यांचे विरूद्ध भा द वि कलम 143,147,149,365,452,327, 342, 324, 323, 504,506 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकाँ/1707 पी ए बारगजे हे करीत आहेत.
सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री.राकेश ओला सो, अपर पोलीस अधिक्षक श्री प्रशान खैरे सो, उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. अजित पाटील सो यांचे मार्गदर्शना खाली सपोनी/शिशिरकुमार देशमुख, पोहेकाँ/215 विलास गारूडकर, पोना/1407 भानूदास खेडकर, पोना/2178 राहुल द्वारके, पोकाँ/810 अमोल आव्हाड, चापोकाँ/841 अरूण मोरे अशांनी केली असून सदरचा पुढील तपास पोहेकाँ/1707 पांडूरंग बारगजे हे करीत आहेत.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे