वाळकी येथील एन.डी. कासार कॉलेज ऑफ फार्मसी येथे बाईपण भारी देवा- जागर मंगळागौरीचा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात

अहमदनगर दि.26 सप्टेंबर (प्रतिनिधी )नगर तालुक्यातील वाळकी येथील एन.डी. कासार कॉलेज ऑफ फार्मसी येथे बाईपण भारी देवा- जागर मंगळागौरीचा २०२३ हा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात पार पडला.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
उखाणे, पारंपरिक लोकनृत्य आणि प्रचलित गाणी म्हणत वेगवेगळ्या गाण्यांनी हा खेळ रंगला.
बाईपण भारी देवा-जागर मंगळागौरीचा 2023 या कामाचे आयोजन एन.डी.कासार शिक्षण संस्थेच्या संचालिका कविता विक्रम कासार यांनी केले.
तालुक्यातील मंगळागौरीचा हा भव्य दिव्य स्वरूपाचा हा पहिलाच कार्यक्रम ठरला.
नऊवारी साडी नेसून नाकात नथ आणि पारंपरिक दागिने घालून महिला सहभागी झाल्या होत्या.
सहभागी झालेल्या सर्वच महिलांना प्रोत्साहन म्हणून सन्मान चिन्ह देण्यात आले.
चौकट
भारतीय संस्कृती जोपासण्यासाठी हा कार्यक्रम घेतला आणि त्यास प्रचंड प्रतिसाद मिळाला.
भविष्यात हा उपक्रम सुरु ठेवण्याचा मानस आहे.
– कविता विक्रम कासार.
बाईपण भारी देवा या गाण्यावर महिलांनी ठेका धरला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगल सुहास बोठे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी
सिद्धकला महिला मंच, हिरकणी महिला ग्रुप आणि लक्ष्मी महिला ग्रुपचे सहकार्य लाभले.
महिला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करून कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला.