धार्मिक
हर हर महादेव” च्या गजरात साईराम सोसायटी येथे तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त भंडाऱ्याचा कार्यक्रम भक्तीपूर्ण वातावरणात संपन्न

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर :दि. 11ऑगस्ट:
नगर कल्याण रस्त्यावरील साईराम सोसायटी येथे विश्वेश्वर महादेव मंदिरामध्ये तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी रामभाऊ नळकांडे, श्याम आप्पा नळकांडे, महेश लोंढे,युवराज शिंदे, साईराम सोसायटीचे अध्यक्ष सुनील शिंदे, उपाध्यक्ष दत्तात्रय पारखे,सोसायटीचे सचिव श्रीपाद वाघमारे,अरुण पारखे महाराज,महेश भोसले, संजय ताकवले, रामन्ना गालपेल्ली, राहुल पुंड,अण्णा गहिले, राजू उल्हारे,संजय आकुबुद्दीन, आदी उपस्थित होते. यावेळी हर हर महादेव च्या गजरात उपस्थित मान्यवरांनी आरती करत महादेवाची आराधना केली.
त्यानंतर परिसरातील नागरिकांसाठी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी बालगोपाळांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



