टाकळी खादगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रुग्णांना मुदत संपलेल्या औषधाचे वितरण. रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व स्टाफ यांच्यावर कडक कारवाई करा: जन आधार सामाजिक संघटनेची मागणी
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन

अहमदनगर दि. ३० (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील टाकळी खादगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रुग्णांना मुदत संपलेले औषध देत असल्याच्या निषेधार्थ जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने वैद्यकीय अधिकारी व तेथील स्टाफ यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषद येथील मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देताना जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे, दीपक गुगळे, अमित गांधी, विजय मिसाळ, गौतमी भिंगारदिवे, रोहिणी पवार, आरती शेलार, वर्षा गांगर्डे आदीसह पदाधिकारी उपस्थित होते. कु.प्रणाली शिवाजी नरवडे हिला मागील 2-3 दिवसांपासुन पोटात दुखत असल्याचा त्रास जाणवल्याने तिचे वडील शिवाजी धोंडीभाऊ नरवडे यांनी उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र टाकळी- खादगाव येथे नेले. त्यावेळी तेथे उपलब्ध असलेल्या वैद्यकीय अधिकारी (डॉक्टर) दुर्गा सयाजी बेरड, यांनी तपासून काही औषध दिले. त्यासोबत प्रामुख्याने शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखण्यासाठी ORS, चे 3 पाकिटे दिले. परंतु घरी गेल्यानंतर तिच्या पालकांना ही बाब लक्षात आली, की दिलेली 3 पाकीट ही एक्सपायरी डेट संपलेली आहेत. म्हणजे रुग्णाला दिलेले ORS, चे पाकीट हे मागील 5 महिन्यांपूर्वीच वापरासाठी आयोग्य झालेले आहेत.
तरीही ती दिली गेली. रुग्णाची उन्हाळ्यात अति उष्णतेमुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन उष्माघातामुळे रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. अशा वेळी ORS हे सलाईन प्रमाणे काम करते आणि रुग्णांची पाणीपातळी तात्काळ ठीक करून प्राण वाचविते.परंतु हेच मुदत संपलेले ORS दिल्याने रुग्णांना फूड पॉयझनिंग होऊ शकते. आणि त्याने रुग्णाच्या जीवावरही बेतू शकते. त्या मुळे ग्रामीण रुग्णालय टाकळी-खातगाव येथील वैद्यकीय अधिकारी( डॉक्टर) ने तर कहरच केला, केवळ 4 वर्षे वयाच्या मुलीला मुदत संपलेले ORS दिले, परंतु तीचे दैव बलवत्तर म्हणून तिच्या घरच्यांना ही पाकिटे मुदत संपलेली आहे. ते कळले आणि तिचा जीव वाचलागेला परंतु तरीही आपल्या कर्तव्यात कसूर करणाऱ्या आणि रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या ग्रामीण रुग्णालय टाकळी खातगाव येथील डॉक्टर व स्टाफ यांच्यावर योग्य ती कार्यवाही व्हावी, अन्यथा जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.