साहेब मागासवर्गीय शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ करावी:विजय जगताप
केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांना निवेदन

केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांना निवेदन
अहमदनगर दि.१२ मार्च (प्रतिनिधी):- केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले दि.११/३/२०२२ रोजी अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर आले असता शासकीय विश्रामगृह अहमदनगर येथे दि.१२/३/२०२२ रोजी पत्रकार परिषदेनंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा उपाध्यक्ष विजय जगताप यांनी नामदार आठवलेंना निवेदन दिले कि गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या संकटामुळे महाराष्ट्रामध्ये लॉक डाऊन लागू झाल्यामुळे त्याचा फटका अनेक गोरगरीब विद्यार्थी व पालक यांना ऑनलाइन शिक्षणामुळे बसलेला आहे.ऑनलाईन शिक्षणासाठी अनेक गरजू विद्यार्थ्यांना मोबाईल विकत घ्यावे लागले व त्यासाठी लागणारा नेट बॅलन्स यासाठी देखील पैसे खर्च करावे लागले. तसेच या लॉकडॉन मुळे आर्थिक अडचण आई-वडिल किंवा घरातील कर्ता पुरुष यांना काम नसल्याने अनेक गोरगरीब मागासवर्गीय विद्यार्थी शिक्षणापासून देखील वंचित राहिले आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी व विद्यार्थ्यांच्या पालकांनी ऑनलाइन शिक्षण घेतले त्यांना बराच मोठा आर्थिक बोजा सहन करावा लागला त्यामुळे आपण या देशाचे सामाजिक न्याय आणि अधिकारिता या खात्याचे मंत्री म्हणून मागासवर्गीय विद्यार्थ्यांची आर्थिक दृष्ट्या होणारी अडचण समजून घेऊन त्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ करून लवकरात लवकर शिष्यवृत्ती मिळण्यासाठी आपण योग्य ती कारवाई चे आदेश संबंधित विभागाला करावे अशी निवेदनाद्वारे जगताप यांनी मागणी केली आहे.