गुन्हेगारी
पारनेर येथील व्यापाऱ्याची फसवणुक करणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद

अहमदनगर दि. १० ऑगस्ट (प्रतिनिधी) पारनेर येथील व्यापाऱ्याची फसवणुक करणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केल्याची बातमी समोर आली आहे.
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, दिनांक 03/04/23 रोजी फिर्यादी श्री. वैभव प्रदीप औटी वय 23, धंदा ड्रायव्हर, रा. कोर्ट गल्ली, ता. पारनेर यांना अनोळखी इसमाने फोन करुन महावीर सुपर शॉपी टाकळी ढोकेश्वर येथे कोल्ड्रींक्सचे विविध प्रकारचे बॉक्सची ऑर्डर दिली. तसेच पुन्हा फोन करुन कोल्ड्रींक्सचे बॉक्स गोडावुनमध्ये ठेवायचे आहे असे म्हणुन फिर्यादीस रस्त्यात थांबवुन एका पांढरे रंगाचे पिकअप मधील दोन अनोळखी इसमांना विविध प्रकारचे कोल्ड्रींक्सचे बॉक्स देण्यास सांगितले. व फिर्यादीने ढाकळी ढोकेश्वर येथील महावीर सुपर शॉपी येथे उर्वरीत कोल्ड्रींगचे बॉक्स देण्यास गेले असता संबंधीत दुकानदाराने कोणत्याही प्रकारची ऑर्डर दिली नसल्याचे सांगितल्याने फिर्यादीस फसवणुक झाल्याचे लक्षात येताच पारनेर पो.स्टे. गु.र.नं.413/23 भादविक 420, 406, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमुन, गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेशित केले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सफौ/भाऊसाहेब काळे, पोहेकॉ/मनोहर गोसावी, विजय वेठेकर, शरद बुधवंत, पोना/रविंद्र कर्डीले, विजय ठोंबरे, विशाल गवांदे, पोकॉ/रणजीत जाधव, शिवाजी ढाकणे, चापोहेकॉ/अर्जुन बडे अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन वर नमुद गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले. पथक अशा प्रकारचे गुन्हे करणारे आरोपी व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे आरोपींचा शोध घेत असताना पोनि/श्री. दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, इसम नामे ऋषीकेश वंजारी, रा. गदेवाडी, ता. शेवगांव याने केला असुन तो त्याचे गांवी आला असुन आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाली. पोनि/श्री. आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळवुन, पंचाना सोबत घेवुन, नमुद ठिकाणी जावुन खात्री करुन कारवाई करणे बाबत कळविले.
पथकाने तात्काळ बातमीतील नमुद ठिकाणी गदेवाडी, ता. शेवगांव येथे जावुन संशयीत इसम ऋषीकेश वंजारी याचे ठावठिकाणाबाबत माहिती प्राप्त करुन ते मिळुन आल्याने त्यास शिताफीने ताब्यात घेतले. त्यास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव 1) ऋषीकेश कैलास वंजारी रा. गदेवाडी, ता. शेवगांव असे सांगितले. त्याचेकडे वर नमुद गुन्ह्या बाबत विचारपुस करता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास पुढील तपासकामी पारनेर पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास पारनेर पोलीस स्टेशन करीत आहे.
आरोपी ऋषीकेश कैलास वंजारी हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द शेवगांव पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 802/2022 भादविक 341, 506, 201 सह आर्म ऍ़क्ट 4/25 प्रमाणे एक गुन्हा दाखल आहे.
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर व मा. श्री. संपत भोसले साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर ग्रामिण विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.