राजकिय

28 सप्टेंबर रोजी रिपब्लिकन सेनेची शासकीय विश्राम गृह येथे जिल्हा बैठक

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर : दि. 26 सप्टेंबर : महाराष्ट्र राज्यात सध्या महायुतीचे सरकार अस्तित्वात आहे सरकारचे काम व राबवलेल्या योजना निश्चितपणे अत्यंत चांगले आहे हेच काम राज्याच्या हितासाठी आणखी चांगल्या पद्धतीने व्हावे यासाठी राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर या दोन नेत्यांनी शिवसेना (शिंदे ) गट व रिपब्लिकन सेनेने युती करण्याचा निर्णय घेतला या निर्णयामुळे बहुजन समाजामध्ये आनंददायी वातावरण निर्माण झाले.
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगर पालिका, नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन सेना अहिल्यानगर दक्षिण जिल्ह्याच्या वतीने जिल्हाव्यापी बैठकीचे आयोजन रविवार दिनांक 28 सप्टेंबर रोजी संभाजी रस्त्यावरील शासकीय विश्राम ग्रह येथे दुपारी बारा वाजता घेण्यात येणार आहे यावेळी यावेळी विविध पक्षातील असंख्य कार्यकर्ते यांचा देखील रिपब्लिकन पक्षप्रवेश पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती रिपब्लिकन सेनेचे दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे यांनी दिली आहे. सदर जिल्हा नगर शहरासह जिल्ह्यातील तालुक्यातील गावागावातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा अध्यक्ष सुनील शिंदे, जिल्हा प्रसिद्ध प्रमुख महेश भोसले,युवकांचे जिल्हाध्यक्ष अतुल भिंगारदिवे,विकास रणदिवे, विवेक विधाते, जिल्हा महिलासंघटक बेबीताई टकले, महिला शहर अध्यक्ष सुनीता शिंदे, नेहा जावळे त्याचप्रमाणे पक्षातील पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे