सामाजिक

अल्पवयीन मुलगी पळवून नेल्याप्रकरणी रिपब्लिकन सेनेचे पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण.

अहिल्यानगर (प्रतिनिधी)– पाथर्डी तालुक्यातील रुपनरवाडी परिसरातील अल्पवयीन मुलगी (वय 17 वर्षे) हिला फुस लावून पळवून नेल्याप्रकरणी पोलिस प्रशासनाने तात्काळ शोधमोहीम राबवून मुलीचा शोध घ्यावा अशा मागणीचे निवेदन रिपब्लिकन सेनेतर्फे जिल्हा पोलीस अधीक्षकांना देऊन उपोषण करताना रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष (दक्षिण) सुनील शिंदे, महेश भोसले, अतुल भिंगारदिवे, विलास गजभिव, कविता सोनवणे, संतोष शिरसाट, वंदना शिरसाट, कृष्णा गाडे, सुनीता शिंदे, नेहा जावळे, बेबीताई टकले, लक्ष्मण काळोखे, बाळासाहेब वाघमारे, रामदास माळी, उषा शिरसाट, लताबाई साळवे, दैवशाला माळी, सुशीला बर्डे, रेशमा चव्हाण, अमोल जाधव आदी उपस्थित होते.
पुढे निवेदनात म्हटले आहे की, दिनांक 05/01/2025 रोजी सदर मुलगी सकाळी घराबाहेर गेल्यानंतर परतली नसल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध केली. मात्र तिचा पत्ता लागला नाही. मुलीचा मोबाईलही बंद येत असल्याने ती अज्ञात ठिकाणी नेल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेविषयी कळविण्यासाठी कुटुंबीयांनी स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली. तथापि, पोलिसांकडून तत्काळ कारवाई न झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. यामुळे मुलीच्या सुरक्षिततेबाबत कुटुंबीयांमध्ये व समाजात तीव्र चिंता व्यक्त होत आहे. या संदर्भात रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचा सुरू केले आहे. मुलीला सुरक्षित शोधून न दिल्यास पोलिस प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा देखील देण्यात आला आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे