देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर : दि. 19 जानेवारी : अहिल्यानगर महानगर पालिकेच्या 2026 च्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 13 मधून राष्ट्रवादी (अजित पवार ) गटाकडून अनुसूचित जाती अ सुरेश लक्ष्मण बनसोडे, नागरिकांचा मागास प्रवर्ग ब पडोळे सुजाता महेंद्र (गोरख ), सर्वसाधारण महिला शेटीया अनिता विपुल, सर्व साधारण ड मधून अविनाश (तात्या ) हरिभाऊ घुले हे निवडणुक प्रभाग विकासाच्या मुद्यावर विक्रमी मतांनी निवडून आले.
प्रभाग 13 मधून नगरसेवक सुरेशभाऊ बनसोडे विक्रमी मतांनी निवडून आल्याबद्दल विनियार्ड ब्लेसेड चर्च युथ ग्रुपच्या वतीने त्यांचा व नगरसेवक विपुल शेटीया यांचा सन्मान चिन्ह, शाल, पुष्पगुच्छ देत हॉटेल राजयोग येथे सन्मान करण्यात आला.
यावेळी चर्चचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा