ब्रेकिंगसामाजिक

प्रेम प्रकरणातून मी “त्याच्याशी ” मुस्लिम पद्धतीने लग्न केले,पण आज मी भोगतेय नरक यातना! लव्ह जिहाद कडून हिंदू तरुणीवर अत्याचार, पीडित तरुणीने मांडली पत्रकार परिषदेत व्यथा

 

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर : दि. 3 जुलै (प्रतिनिधी ) मी प्रेम प्रकरणातून पत्रकार मन्सूर शेख यांचा मुलगा जुनेद शेख बरोबर 6 वर्षापूर्वी कापूरवाडी येथे बडी मस्जिद के मौलाना यांच्या साक्षीने मुस्लिम पद्धतीने 2019 साली लग्न केले. त्यानंतर एक ते दीड वर्षाने आम्हाला मुलगा झाला, पण आज सदर व्यक्ती त्या मुलाचे पालकत्व नाकारत आहे, आज मी नरक यातना भोगत असून लव्ह जिहाद कडून अन्याय होत असल्याची व्यथा पीडित हिंदू तरुणीने आयोजित पत्रकार परिषदेत मांडली. यावेळी बोलतांना ती तरुणी म्हणाली, माझ्याकडे मुस्लिम पद्धतीने लग्न झाल्याचे सर्व पुरावे असून सुद्धा मुलाचे पालकत्व नाकारत असून विवाहास सुद्धा नकार देत आहे, त्याने माझी फसवणूक केली. ,याबाबत मदत मागण्यासाठी खासदार निलेश लंके यांना फोन केला पण काही मदत न झाल्याची खंत तरुणीने व्यक्त केली. यावेळी बोलतांना ती म्हणाली याबाबत मुलाचे वडील पत्रकार मन्सूर शेख यांना देखील सांगण्यासाठी गेले असता, आमचे मोठ मोठया लोकात, राजकीय नेत्यांमध्ये उठणे बसने असून खासदार लंके यांच्याबरोबर आमचे चांगले संबंध असल्यामुळे तू कोठेही गेली तरी काही फायदा होणार नाही, अशी उडवा उडवी ची उत्तरे देण्यात आली.
याबाबत माझी फसवणूक झाली असल्याचे तिने माध्यमाना सांगतले. तसेच मी ज्या पद्धतीने लव्ह जिहादची बळी ठरले, तसे हिंदू तरुणी व महिलांनी होऊ नये, असे आवाहनही तिने केले.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे