देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर : दि. 5 सप्टेंबर :अहिल्यानगर महानगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे. याच पार्श्वभूमीवर दिनांक 3 सप्टेंबर रोजी महापालिकेची प्रभाग रचना जाहीर करण्यात आलेली आहे. अहिल्यानगर महापालिका हद्दीमध्ये एकूण 17 प्रभाग असून प्रत्येक प्रभागांमध्ये चार नगरसेवक असणार आहे. अशा पद्धतीची प्रशासनाकडून माहिती मिळालेली आहे.
शहरातील अनेक तरुण नेतृत्वांना संधी देण्याची भूमिका प्रत्येक राजकीय पक्षांची दिसत आहे. फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते प्रभाग क्रमांक 15 मध्ये राहत असलेले विनोद गायकवाड हे तरुण नेतृत्व असून त्यांच्या नावाची प्रभाग क्रमांक 15 मधून नागरिकांमध्ये जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. त्यांची पार्श्वभूमी जर पाहिली तर भारिप बहुजन महासंघ ते वंचित बहुजन आघाडी असा त्यांचा राजकीय सामाजिक प्रवास राहिलेला आहे. सातत्याने फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीत काम करत असताना प्रत्येक माणसाच्या सुखदुःखामध्ये सक्रिय असणारे कार्यकर्ते म्हणून त्यांची या भागातच नव्हे तर शहरात ओळख आहे.
शिव,फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांमधून त्यांना शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळावी. अशी चर्चा संपूर्ण नगर शहरांमध्ये रंगत चाललेली आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा