कायनेटिक चौक येथे अवैद्य धंदे चालकांकडून तरुणास जबर मारहाण गुन्हा दाखल करा तरुणाची पोलिस अधीक्षकांकडे तक्रार

अहमदनगर दि.४ जुलै (प्रतिनिधी) – कायनेटिक चौक येथे हॉटेल साईसूर्या येथे जेवण करायला जात असताना तीन ते चार इसमांनी गाडीवर येऊन मला कट मारला विचारणा केली असता सदर इसम फैरोज व साबीर यांनी मला मारहाण केली. सदर घटना झाल्यानंतर मी तात्काळ कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये गेलो व आरोपींविरुद्ध तक्रार दिली परंतु पोलीस प्रशासाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही. सदर आरोपींचे कायनेटिक चौक तसेच शहरांमध्ये अवैद्य धंदे आहे. या आरोपींवर सदर ठिकाणी सी.सी.टी.व्ही फुटेज तपासून तात्काळ गुन्हा दाखल करावा हे दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार आहे त्यांना पोलिसांनी हद्दपारच्या नोटीसही दिले आहे परंतु या आरोपींवर गुन्हा दाखल झाला नाही तरी सदर प्रकरणाची चौकशी करून लवकरात- लवकर गुन्हा दाखल करून मला योग्य तो न्याय मिळावा अशी मागणी निवेदनाद्वारे मारहाण झालेला तरुण चंद्रकांत अशोक सातपुते राहणार कोठला, अहमदनगर यांनी केली.