प. पु. माताजी श्री निर्मला देवी यांचा 100 वा वाढदिवस संपन्न

अहमदनगर दि. २३ मार्च (प्रतिनिधी)
प. पु. माताजी श्री निर्मला देवी यांचा 100 वा वाढदिवस सहज भुवन, अहमदनगर येथे अहमदनगर जिल्हा सहजयोग समिती च्या वतीने साजरा करण्यात आला अशी माहिती अहमदनगर जिल्हा समन्वयक श्रीनिवास बोज्जा यांनी दिली.
प. पु. माताजींचा वाढदिवस संपूर्ण जगातील 140 देशापेक्षा जास्त देशात साजरा करण्यात आला. प. पु. माताजी श्री निर्मला देवी यांचा जन्म मध्यप्रदेश मधील छिदवाडा येथे झाला असून छिन्दवाडा हे गाव भारताचा मध्य भाग असून 21 मार्च 1923 साली जन्म झालेला असून 21 मार्च हा दिवस वर्षातून एकच दिवस 12 तास रात्र व 12 तास दिवस असा असतो व माताजींचा जन्म भर दुपारी 12.00 वाजता झाला. एकूणच संतुलन स्थितीत आदिशक्ती चा जन्म झाला. या दिवसाचे मोठे महत्व सहजयोगा मध्ये असून सर्व सहजयोगी हा दिवस मोठा सण म्हणून साजरा करतात अशी माहिती राज्य कमिटी सदस्य अंबादास येन्नम यांनी दिली.
अहमदनगर मधील युवशक्तींनी पूजेचे संपूर्ण नियोजन केले व महिला युवशक्तींनी लेझीम डाव बसवून नववारी साडी घालून फेटे बांधून माताजींचे स्वागत केले. डॉ. सचिन जाधव यांच्या कन्येने माताजींचे दोन मोठे सुंदर पोट्रेट बनवून आश्रम ला भेट दिली. 100 नंबर चा मोठा केक आणला, युवाशक्ती मुलींनी सुंदर 100 वा वाढदिवस शुभेच्छा बाबत रांगोळी काढली. युवाशक्ती मुलांनी भरपूर कष्ट घेऊन स्टेज डेकोरेशन केले, माताजींचे सिंहासन वेगवेगळ्या सुंगधी फुलांनी सजवले. विशेष म्हणजे महिला शक्तिनी आलेल्या सर्व सहजयोग्याना पुरणपोळी चा महाप्रसाद देऊन सर्वांची नाभी तृप्त केली. पूजेचा लाभ अहमदनगर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील सहजयोग्यांनीही घेतला.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राजेंद्र द्यावनपेल्ली, राहुल सातपुते, योगेश सूर्यवंशी, गजेंद्र सांगळे, राजू मंचे, अभय ठेंगणे, आबासाहेब दांगडे, प्राचार्य गिताराम वाघ, डॉ.चंद्रशेखर अकोलकर, डॉ. सचिन जाधव, श्रीमती जयश्री सामलेटी, सौ. रजनी बनसोडे, मनी दुग्गल, सौ. वासंती वैद्य, अथर्व बोज्जा, उन्नती द्यावनपेल्ली, साक्षी जोग, वैष्णवी रच्चा व पुर्वजा बोज्जा आदिनी परिश्रम घेतले.