सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याची माझी पद्धत : आयुक्त डॉ. पंकज जावळे नूतन आयुक्तांचे “स्नेहबंध’तर्फे स्वागत

अहमदनगर दि.२५ जुलै (प्रतिनिधी) – सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याची माझी पद्धत आहे. पण बेकायदेशीर काम होत असेल तर तेथे कडक भूमिका घेतली जाईल, असे मनपाचे नूतन आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी सांगितले.
अहमदनगर मनपाचे नूतन आयुक्त डॉ. जावळे यांचे स्नेहबंध फाउंडेशनच्या वतीने स्वागत करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी स्नेहबंधचे अध्यक्ष उद्धव शिंदे, शिल्पकार बालाजी वल्लाल, हेमंत ढाकेफळकर आदी उपस्थित होते. डॉ. जावळे यांचा शाल व भुईकोट किल्ल्याची प्रतिकृती भेट देऊन सत्कार करण्यात आला.
नूतन आयुक्त डॉ. जावळे यांनी यापूर्वी नगरमध्ये उपायुक्त म्हणून चांगले काम केले आहे. ते म्हणाले, सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी मी येथे आलो आहे. नगरला येताना मी काही कल्पना घेऊन आलो आहे. मी कोणाला समजावून सांगतो, कायदेशीर नोटीस देतो तरीही ऐकले नाही, तर कायद्याचा बडगा दाखवतो, असेही आयुक्त डॉ. जावळे म्हणाले.
*******
शहर विकासासाठी “पंचसूत्री”वर भर द्यावा
शहरातील कचरा, पाणीपुरवठ्याचे प्रश्न सोडवण्याला प्राधान्य देण्याबरोबरच उद्यान, शहरातील रस्ते, आणि मुख्य रस्त्यावरील वाहतूक या पंचसूत्री कार्यक्रमावर भर द्यावा, अशी अपेक्षा स्नेहबंधचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांनी व्यक्त केली.