सकल मराठा सोयरीक ‘ तर्फे रविवारी पारनेर शहरात सकल मराठा वधू-वर परिचय मेळावा

पारनेर (प्रतिनिधी):- सकल मराठा सोयरीक ग्रृप शाखा पारनेर व जिजाऊ ब्रिगेड पारनेर आणि गणेश औटी मित्र मंडळ पारनेर यांच्या विद्यमाने पारनेर जि.अहमदनगर येथे सकल मराठा समाजासाठी वधु-वर थेट-भेट परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे हा मेळावा रविवारी (दि. १३/०३/२०२२) सकाळी दहा ते तीन या वेळेत लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय, पारनेर येथे होणार असल्याची माहिती सकल मराठा सोयरीक ग्रुपचे कार्याध्यक्ष हरीभाऊ जगताप यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिली.
ते पुढे म्हणाले कि,विविध प्रांतांमध्ये पसरलेला सकल मराठा समाजाला आपल्या ग्रुपवर वधू-वरांच्या सोयरिकी च्या निमित्ताने सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून सकल मराठा समाजाचे संघटन एकत्रित करण्याचे कार्य सकल मराठा सोयरीक ग्रुपच्या माध्यमातून होत असून राज्यभरात ३३० तालुक्यात फक्त व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात सध्या काम चालू आहे. सकल मराठा सोयरिक ग्रुप वधू-वर थेट-भेट परिचय मेळाव्यात आत्तापर्यंत अहमदनगर जिल्ह्यात ५५१० विवाह जुळून आले आहेत.राज्य बाहेर सुद्धा सकल मराठा सोयरीक ग्रुपचे काम चालू आहे अशी माहिती जिजाऊ ब्रिगेडच्या रोहीणीताई वाघमारे,यांनी दिली.सध्या समाजामध्ये काही बोकाळलेल्या विवाह संस्था,विवाह संबंध जुळून आणणारे काही प्रमाणात दलाल या सर्वांना आळा बसवण्यासाठी हा अल्पसा प्रयत्न महाराष्ट्रभर सोयरीक ग्रृपच्या माध्यमातून सध्या सुरू आहे.
विवाहइच्छुंचे लग्न जमविणे सकल मराठा समाजातही आता दिवसेंदिवस अत्यंत जिकिरीचे झाले आहे.उच्च शिक्षण घेऊनही नोकऱ्या नाहीत.डीएड प्रमाणेच अभियांत्रिकी व अन्य पदवीधारांमध्ये ही प्रचंड बेरोजगारी असल्याने त्यांच्या पालकांमध्ये ही उदासीनता दिसते.त्यामुळे मराठा समाजात ही विवाह विवाहेच्छूकांची सोयरीक योग्य वेळेतच होणे गरजेची झाली आहे.त्यासाठी जिल्हानिहाय व तालुकानिहाय वधु-वर थेटभेट मेळावे होत आहे.तरी सकल मराठा समाजातील विवाहच्छूक वधू-वर व त्यांच्या पालकांनी आपल्या मुला मुलीची पारनेर जि.अहमदनगरच्या वधु-वर थेट भेट मेळाव्यात नाव नोंदणी करावी असे आवाहन सकल मराठा सोयरीक ग्रुप चे राज्य निरीक्षक रघुनाथ झावरे यांनी केले.या मेळाव्यात नगर,शिरुर,आळेफाटा,नगर शहर,व परिसरातील जिल्ह्यातील व आदी तालुक्यातुन व जिल्ह्यातील विवाहइच्छूक मोठ्या संख्येने मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत.या मेळाव्यासाठी आपत्ती व्यवस्थापन,मदत पुनर्वसन शाखेने जाहिर केलेल्या नियमानुसार मेळाव्यात उपस्थित असणारे विवाहइच्छूक वधु-वरांचे व पालकांचे लसीकरण झालेले गरजेचे आहे, मास्क,सॅनिटायझर सक्तीचे करण्यात आले असून जागेच्या ५० टक्के लोकांना परवानगी दिली जाणार आहे. तसेच स्वतःचे फोटो,बाॅयोडाटा सह उपस्थित रहावे,असे आवाहन सकल मराठा सोयरीक ग्रुपचे राज्याध्यक्षा,सौ.रजनीताई गोंदकर,जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा,शिवमती,संपुर्णाताई सावंत,युवक नेते गणेश औटी,लक्ष्मण मडकेपाटील,बाळासाहेब भोर,विनोद वाडेकर,अनिल गडाख,प्रा.रामचंद्र राऊत,सौ.मायाताई जगताप,सौ.शितलताई चव्हाण,सुरेखा चेमटे,बाळासाहेब वाकचौरे,राजेश सरमाने,सौ.शारदाताई पवार, श्रीमती,नंदा वराळे,अच्युत गाढे,जयकिसन वाघपाटील, यांनी केले आहे .