शिवसेना अनुसूचित जाती विभागाच्या अहमदनगर जिल्हा अध्यक्षपदी किशोर वाघमारे यांची निवड!

दाढ खुर्द वार्ताहर संगमनेर तालुक्यातील पूर्व भागातील शिर्डी विधानसभा मतदारसंघातील खळी येथील व अहमदनगर जिल्ह्याची आंबेडकर चळवळीची बुलंद तोफ आदर्श पत्रकार श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट खळीचे अध्यक्ष किशोर भाऊ वाघमारे यांची शिवसेना पक्षाच्या अनुसूचित जाती विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केल्याची घोषणा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनुसूचित जाती विभाग डॉक्टर राजू वाघमारे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथराव शिंदे यांच्या आदेशान्वये करण्यात आल्याची घोषणा मुंबई येथील नरिमन पॉईंट मंत्रालय समोरील स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे भवन येथे करण्यात आली. यावेळी पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली सदर बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्यांमधील संपूर्ण जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी पदाधिकारी नेमलेले नव्हते त्या ठिकाणी नव्याने पदाधिकाऱ्यांचे नेमणूक करून आगामी विधानसभा व इतर निवडणुका काही महिन्यावर असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही महत्त्वाच्या नियुक्ती जाहीर केल्या असून त्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातून आंबेडकर चळवळीची बुलंद तोफ किशोर भाऊ वाघमारे यांची निवड केली असल्याची घोषणा मुंबई येथे करण्यात आली किशोर भाऊ वाघमारे हे गेली वीस वर्षांमध्ये आंबेडकर चळवळीमध्ये रिपब्लिकन पक्षांमध्ये विविध पदावर तालुक्यापासून महाराष्ट्र राज्य कार्यकारणी पर्यंत काम केलेले असून अनुसूचित जाती विभागामध्ये एक अनुभवी कार्यकर्ता म्हणून किशोर वाघमारे हे असल्याचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉक्टर राजू वाघमारे यांनी म्हणाले आहे किशोर वाघमारे यांचा अहमदनगर जिल्ह्यातील अकरा तालुक्यामध्ये दांडगा जनसंपर्क असून त्यांनी या अगोदर अनुसूचित जाती च्या विविध प्रश्नावर आंदोलने मोर्चे काढले आहे ते उच्चशिक्षित असून त्यांच्या गावातील मोठ्या देवस्थानचे अध्यक्ष आहे तसेच अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील आमदार खासदार जिल्हा परिषद सदस्य व इतर राजकारणी हे त्यांच्या ओळखीचे असून अहमदनगर जिल्ह्यातील मागासवर्गीय बौद्ध समाजाची जनता ही त्यांच्या अतिशय परिचय व जवळची असून त्यांच्या रूपाने सर्व वाशी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार व शिवसेना पक्षाचे विचार तळागाळातील गरीब माणसापर्यंत पोहोचतील तसेच एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या सरकारच्या माध्यमातून समाजातील गरीब घटकासाठी अनेक योजना राबवलेले आहे त्या योजना शिवसेना पक्ष अनुसूचित जाती विभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉक्टर राजू वाघमारे यांच्या माध्यमातून प्रत्येक गावातील कुटुंबामध्ये सरकारच्या विविध योजना जाणार असून एकनाथ शिंदे यांच्या सरकारने समाजकार्याचा विविध महामंडळामध्ये महिला बालकल्याण च्या माध्यमातून लोकाभिप वैयक्तिक लाभाच्या योजना शेतकऱ्यांच्या योजना मागासवर्गीय उन्नतीच्या योजना शिष्यवृत्तीच्या योजना मुलींना मोफत शिक्षण महिलांना दरमहा पंधराशे रुपये अपंगाच्या कल्याणाच्या विविध योजना मुख्यमंत्री सन्मान योजना सौर ऊर्जा प्रकल्प योजना आदी महत्त्वाच्या योजना या गावोगावी पोहोचवण्यासाठी मदत करून पक्ष वाढीसाठी काम करतील अशी अपेक्षा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉक्टर राजू वाघमारे यांनी व्यक्त केली असून त्यांच्या निवडीने अहमदनगर जिल्ह्यातील तमाम अनुसूचित जाती विभागाच्या नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाली असून लवकरच मागासवर्गीय समाजाचा अहमदनगर जिल्ह्यामध्ये भव्य दिव्य मोर्चा अहमदनगर शहर व संगमनेर शिर्डी या भागामध्ये घेणार असून येत्या काही दिवसांमध्ये सर्व तालुक्याचा तालुका मध्ये दौरा करून जिल्हा कार्य करणे सह तालुका कार्य करणे शाखा कार्य करणे जाहीर करणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून गाव तिथे शिवसेनेची शाखा संकल्पना राबवणारा असून अनुसूचित जाती विभागाच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राबवलेल्या विविध योजनांचा संकल्प रथ संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावात फिरवणार असल्याचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती विभाग अहमदनगरचे किशोर भाऊ वाघमारे यांनी म्हणाले आहे माझी निवड केल्याने मी शिवसेना पक्षाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉक्टर राजू वाघमारे यांच्या विशेष आभार मानत असून यापुढील काळामध्ये पक्ष वाढीसाठी व विरोधी पक्षाने केलेल्या खोट्या प्रचाराचा मुद्दा खोडून काढण्यासाठी काम करणारा असल्याचे म्हणाले आहे त्यांच्या निवडीबद्दल शिवसेनेचे नेते माजी खासदार सदाशिव लोखंडे जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते नितीन आवताडे विठ्ठल घोरपडे जिल्हा संघटक श्री काळे यांनी अभिनंदन केले आहे