शिक्षकांनी घेतलेल्या कष्टाचे विद्यार्थिनींनी केले सार्थक:विद्याधर पवार
स्नेहबंधतर्फे शिष्यवृत्ती धारक विद्यार्थीनींचा गौरव...

अहमदनगर (प्रतिनिधी) छावणी परिषद शाळेतील शिक्षकांनी घेतलेल्या कष्टाचे यशस्वी विद्यार्थिनींनी सार्थक केले, असे प्रतिपादन छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांनी केले.
स्नेहबंध फांऊडेशनच्या वतीने शाळेतील शिष्यवृत्ती धारक विद्यार्थीनी श्रावणी अशोक शेलार व आकांक्षा विठ्ठल परदेशी यांच्या गौरव प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी स्नेहबंध फाउंडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे, महिला बालकल्याण अधिकारी सुलक्षणा पवार, प्रभारी मुख्याध्यापक संजय शिंदे, राजेंद्र भोसले, मुबीना शेख, अनुजा शिंदे, सीमा चोभे, स्नेहल लवांडे, रोहित परदेशी, अरविंद कुडिया आदी उपस्थित होते.
स्नेहबंध चे अध्यक्ष शिंदे म्हणाले, छावणी परिषद शाळा राबवत असलेल्या विविध उपक्रमांमुळे शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केले. या शाळेतील शिक्षक उपक्रमशील व कष्टाळू आहेत. त्यांना सदोदित प्रेरणा देण्याचे काम स्नेहबंध फांऊडेशन करत राहील. त्याच उद्देशाने या यशस्वी विद्यार्थिनींच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याकरिता स्नेहबंधकडून या सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे शिंदे यांनी सांगितले.
सुत्रसंचालन सुभाष भारूड यांनी केले.