भारत राष्ट्र समिती BRS या पक्षा शिवाय महाराष्ट्र राज्य ला पर्याय नाही – दशरथ सावंत उत्तर महाराष्ट्र समन्वयक दशरथ सावंत यांची नगर येथे मा. नगरसेविका वीणा बोज्जा यांची घेतली भेट

अहमदनगर दि.८ जुलै (प्रतिनिधी) – भारत राष्ट्र समिती BRS या पक्षाचे उत्तर महाराष्ट्र राज्य समन्वयक दशरथ सावंत यांनी अहमदनगर येथे मा. नगरसेविका सौ. वीणाताई बोज्जा यांची भेट घेतली या वेळी के. एम. वाकचौरे सर, मनोहर मुलुंदकर सर,सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा व तिरमलेश पासकंटी आदी उपस्थित होते.
या वेळी अहमदनगर येथे आगमन झाल्यानंतर दशरथ सावंत यांचे औक्षण करण्यात येऊन सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांचे हस्ते सत्कार करण्यात आले. या वेळी बोलतांना सावंत म्हणाले सध्याची महाराष्ट्र राज्याची राजकीय परिस्थिती अत्यंत गढूळ झाली असून प्रत्येक राज्यकर्त्याला खुर्चीची आस लागली असून खुर्ची साठी आपल्या पक्षाची सर्व ध्येय धोरण वेशीला टांगून आपले स्वार्थ साधण्याचा प्रयत्न राजकारण मंडळी करीत आहे ही गोष्ट राज्याच्या भविष्याच्या दृष्टीने धोकादायक आहे. महाराष्ट्रातील गरीब शेतकर्यांचा कोणीही वाली राहिला नाही. राजकारणी मंडळींनी शेतकऱ्याचा वापर फक्त आपलं स्वार्थ साधण्यासाठी केला आहे.
तेलंगणा मध्ये मुख्यमंत्री के सी आर यांनी संपूर्ण राज्याचे चित्र बदलून टाकले असून शेतकरी हाच राज्याचे मुख्य घटक या उद्देशाने कार्य सुरु केले असल्यामुळे संपूर्ण तेलंगणा राज्यात कुठे ही दुष्काळ आढळून येत नाही, कोणीही शेतकरी आत्महत्या करीत नाही. तेलंगणा राज्याचे शेतकऱ्या बाबतचे कार्य हे भारतात एक नंबरला असून इतर राज्यही त्याचे अनुकरण करीत आहेत. यासाठी महाराष्ट्र राज्यात जर शेतकरी व जनतेचे हित साधायच असेल महाराष्ट्र राज्य सुजलाम सुफलाम करावयाचे असेल तर भारत राष्ट्र समितीBRS ला पाठिंबा देण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य चे उत्तर समन्वयक श्री. दशरथ सावंत यांनी केले आहे.
या वेळी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी दशरथ सावंत याचे कार्याचे कौतुक केले 82 वर्षे वय झालेले असतांना समाजाचे व शेतकऱ्याचे कल्याण व्हावे या साठी उत्तर महाराष्ट्र राज्य पिंजून काढून BRS चे कार्याचे धर्तीवर महाराष्ट्र राज्यात ही असे कार्य व्हावे. ही धडपड वाखणण्यासारखी आहे. सावंत यांचे कार्य तरुणांना लाजवेल असे आहे.
या वेळी मा. नगरसेविका सौ. वीणाताई बोज्जा यांनी स्वागत केले तर आभार तिरमलेश पासकंटी यांनी मानले.