डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा चा मार्ग होणार मोकळा!

औरंगाबाद दि.१४ मार्च (प्रतिनिधी) भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा नगर शहरात पुर्णाकृती पुतळा असावा ही मागणी बरीच जुनी आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती होणे हा आंबेडकरी जनतेच्या अस्मितेचा प्रश्न आहे. त्याच पार्शवभूमीवर अनेकवेळा आंदोलने,मोर्चे, बैठा सत्याग्रह झालेले आहेत.हा प्रश्न न्यायालयीन असला तरी अहमदनगर महापालिकेने याबाबतीत तातडीने पावले उचलत औरंगाबाद हायकोर्टात याबाबत लवकर निर्णय घेण्याचे कळविले होते. याच पार्श्भूमीवर
आज दिनांक १४ मार्च रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा विषयी औरंगाबाद हायकोर्ट मध्ये
महापालिकेचे वकील स्वतः अँड.होन साहेब यांनी एग्रीवमेंट केले असता त्यांच्या सोबतील अँड.लोखंडेही उपस्थित होते. समवेत महापालिकेचे अधिकारी मा.चारटनकर साहेब यावेळी ही संपूर्ण केस अंतिम टप्प्यात असल्याचे समजले.यावेळी आंबेडकरी संघर्ष समिति च्या वतीने अजय साळवे, सुरेश बनसोडे ,सुमेध गायकवाड़,सागर ठोकळ आदि आवर्जून कोर्ट मध्ये उपस्थित होते. तरी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळयाबाबत कोणीही चुकीची माहिती देऊन दिशाभूल करू नये.असे आवाहन आंबेडकरी संघर्ष समितिच्या वतीने करण्यात आले आहे.