प्रशासकिय

विकसीत भारत संकल्प यात्रा रथाचे सारोळा गावात उत्साहात स्वागत !

जामखेड दि.,10 डिसेंबर (प्रतिनिधी )- शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती तळागाळातील लोकांना मिळावी व त्याचा लाभ त्यांना मिळावा या उद्देशाने सुरु झालेली विकसीत भारत संकल्प यात्रा रथाचे सारोळा गावात आगमन होताच विद्यार्थी, शिक्षक , ग्रामस्थ , महिला यांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले . या फेरीत जामखेड तालुक्याचे लोकप्रिय व कार्यतत्पर तहसिलदार श्री . योगेश चंद्रे, आदर्श गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे हेही सहभागी झाले.
या वेळी संपूर्ण गावातून फेरी काढण्यात आली . जिल्हा परिषद सारोळा येथील मुलांनी लेझीम पथक ,ढोलपथक ,लाठी काठी खेळ. अदिंची प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
चित्ररथाचे स्वागत .तहसिलदार श्री . योगेश चंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला ग्रामस्थ व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थित होते .

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे