विशेष प्रशासकीय

व‍िशेष श‍िबीरात ६५ तृतीयपंथीयांना ओळखपत्र व प्रमाणपत्राचे वाटप शासकीय योजनांच्या लाभासाठी ओळखपत्राचा होणार उपयोग

अहमदनगर, ४ जून (प्रतिनिधी) – समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या वतीने ज‍िल्ह्यातील तृतीयपंथीयांच्या नोंदणीसाठी एकद‍िवसीय श‍िबीराचे आयोजन करण्यात आले होते. या श‍िबीरात ज‍िल्ह्यातील ६५ तृतीयपंथीयांची ट्रान्सजेंडर नॅशनल पोर्टलवर नोंदणी करून ज‍िल्हाध‍िकारी डॉ.राजेंद्र भोसले यांची स्वाक्षरी असलेले ओळखपत्र व प्रमाणपत्र देण्यात आले.
अहमदनगर रेल्वे स्थानक रस्त्यावरील अहमदनगर महाविदयालयाच्या समोर असलेल्या ‘समाजकार्य महाविदयालय व संशोधन संस्था’ येथे एकदिवशीय विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या श‍िबीरात समाज कल्याण सहाय्यक आयुक्त राधाक‍िसन देवढे, तृतीयपंथीय जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीचे द‍िशा प‍िंकी शेख, काजलगुरु बाबु नायक नगरवाले, किरण रंगनाथ नेटके उपस्थ‍ित होते.
तृतीयपंथीयांसाठी शासनामार्फत विविध योजना राबव‍िणे, त्यांना प्राथमिक हक्क प्राप्त करून देण्यासाठी transgender.dosje.gov.in हे संकेतस्थळ केंद्र शासनाच्या वतीने व‍िकस‍ित केले आहे. या संकेतस्थळावर नोंदणी केलेल्या तृतीयपंथीयांना ज‍िल्हाध‍िकाऱ्यांच्या स्वाक्षरीने तृतीयपंथीय असल्याबाबतचे प्रमाणपत्र व ओळखपत्र द‍िले जाते. अध‍िकृत ओळखपत्र धारक तृतीयपंथीयांना राज्यशासनाच्या वतीने व‍िव‍िध रोजगार व स्वयंरोजगाराच्या योजना राबव‍िल्या जातात.
या संकेतस्थळाच्या माध्यमातून तृतीयपंथीय ते कुठे असतील तेथून अर्ज करू शकतात. ट्रान्सजेन्डर धोरणानुसार एखाद्याची ओळख दर्शविण्यासाठी आणि पासपोर्ट, आधार, व इतर कागदपत्रांमध्ये बदल करण्यासाठी या प्रमाणपत्राचा उपयोग केला जावू शकतो. त्यामुळे सदर ओळखपत्र/प्रमाणपत्र तृतीयपथ‍ियांसाठी महत्वाचे आहे. सदर ओळखपत्र व प्रमाणपत्र तृतीयपंथीयांनी प्राप्त करून घेतल्यानंतर शासनास त्याआधारे विविध योजना राबविणे शक्य होईल. त्यामुळे अहमदनगर जिल्हयातील सर्व तृतीयपंथीयांनी पोर्टलवर नोंदणी करुन ओळखपत्र व प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे. असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे यांनी केले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे