भाजी बाजारात चालतोय “मटक्याचा बाजार”! नागरिक झालेत “बेजार”!

अहमदनगर दि.१२ नोव्हेंबर (प्रतिनिधी) उप नगरातील तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत बरेच उपनगरे येतात या उपनगरांमध्ये सर्रासपणे मटका, बिंगो ,सोरट या सारखे अवैध धंदे सुरूच आहेत. पोलिसांची कारवाई शून्यच आहे.
उपनगरात यशोदानगर हे एक उपनगर असून या यशोदानगरच्या जवळच ग्राउंड बाजार आहे. हे बाजाराचे ठिकाण असून दुपारी चार ते साडेचार वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत इथे भाजीपाला,मासे तसेच कुटुंब उपयोगी वस्तूंचा बाजार भरतो. विशेष म्हणजे याच ग्राउंड बाजारात मटक्याचाही बाजार रात्री उशिरापर्यंत सुरू असतो. अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.भर बाजारात चालणाऱ्या या मटक्याच्या बाजारामुळे या ठिकाणी भाजीपाला या वस्तू खरेदी करण्यासाठी येणारे नागरिक पुरते” बेजार” झाले आहेत. बाजारात चालणाऱ्या या मटका बाजारामुळे नागरिकांना त्रास होतोय तरी देखील पोलीस कारवाई का करत नाहीत.अशा चर्चा नागरिकांमधून व्यक्त होत आहेत. कायद्याचा धाक सर्व सामान्यांनाच आहे का? अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहेत.
****प्रतिक्रिया*
भर बाजारात चालणाऱ्या या मटक्याच्या बाजारामुळे आम्हाला खूप त्रास सहन करावा लागतो.पण पोलीस कारवाई का करत नाहीत. हेच समजत नाही. एका महिलेने नाव टाकण्याच्या अटीवर दिलेली ही बोलकी प्रतिक्रिया ***** ( महिला नागरिक )
एकंदरीतच भर बाजारात चालणाऱ्या मटका बाजारामुळे परिसरातील नागरिक बेजार झाले आहेत. यावर पोलीस काय कारवाई करणार हा एक महत्वाचा मुद्दा आहे. (भाग: २)