डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी नगर शहर पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे यांच्या समवेत कार्यकर्त्यांनी केले अभिवादन!

अहमदनगर दि. 6 डिसेंबर (प्रतिनिधी ) विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनी शहरातील मार्केट यार्ड येथे नगर शहर पोलीस उप अधीक्षक अनिल कातकडे, कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी शिवसेना (उद्धव ठाकरे ) गटाचे जिल्हा समन्व्यक अशोक गायकवाड, जेष्ठ नेते विजयराव भांबळ,ग्रामीण युवा पत्रकार संघांचे जिल्हा अध्यक्ष तथा देशस्तंभ न्यूजचे मुख्य संपादक महेश भोसले, काँग्रेसचे जेष्ठ नेते सुनिल क्षेत्रे, माजी नगरसेवक संजय झिंजे,मनोज गुंदेचा,किशोर म्हस्के, सोमा शिंदे, भाऊ भिंगारदिवे, अण्णासाहेब गायकवाड,अमित टेबरे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या महिला जिल्हा अध्यक्ष गौतमी भिंगारदिवे, हिराबाई भिंगारदिवे, ऍक्टिव्ह मराठी चॅनलचे संपादक तथा ग्रामीण युवा पत्रकार संघाचे जिल्हा उपअध्यक्ष उमेश साठे, यशवंत भांबळ,दरेवाडी भागातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाजीराव भिंगारदिवे, काँग्रेस नेते उजागरे आदी उपस्थित होते.