कौतुकास्पद

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारोळा शाळेचा द्वितीय क्रमांक

जामखेड(प्रतिनिधी):भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान” शासनामार्फत राज्यातील सर्व शाळाकरिता राबविण्यात आले.सदर अभियानाचे मूल्यांकन नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले.यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातून शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळाचा गट यामधून जामखेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारोळा शाळेने द्वितीय क्रमांक संपादन करत ही शाळा पाच लाख रुपये पुरस्काराची मानकरी ठरली आहे.
सारोळा शाळेला केंद्रस्तरीय,तालुका स्तरीय व जिल्हास्तरीय मूल्यांकन समितीने प्रत्यक्ष भेटी देऊन या अभियानातील विविध निकषानुसार वस्तुनिष्ठपणे तपासणी केली.या शाळेत इयत्ता १ली ते ८वी पर्यंतचे वर्ग असून यामध्ये सध्या १७१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्याचबरोबर ७ शिक्षक विद्यादानाचे कार्य करत आहे.मागील दहा वर्षात सारोळा शाळेने पटसंख्येत ३८ पासून ते १७१ पटसंख्ये पर्यंत मजल मारली असून शाळेतील निसर्गरम्य परिसर,प्रशस्त क्रीडांगण,शालेय रंगरंगोटी,लाखो रुपयांच्या लोकसहभागातून गावाने केलेला शाळेचा कायापालट,शालेय व सहशालेय उपक्रम,विविध गुणदर्शन,सांस्कृतिक,क्रीडा व शालेय स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्याचे सुयश आदि उपक्रमाचे विविध अधिकाऱ्यांनी कौतुक केले.
सदर अभियानाच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने शाळेचे मुख्याध्यापक शहाजी जगताप,माजीद शेख,राहुल लिमकर ,खंडेराव सोळंके सर,प्रशांत होळकर, शबाना शेख व अमृता रसाळ व शाळेतील विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले.या अभियानाकरिता गावपातळीवर सरपंच रितूताई अजय काशिद,अजय दादा काशिद,उपसरपंच हर्षद मुळे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष किशोर सातपुते,उपाध्यक्ष राजेंद्र आजबे,माजी विद्यार्थी व सर्व ग्रामस्थ यांचे विशेष सहकार्य लाभले.
अभियानातील उत्तुंग कामगिरी बद्दल सारोळा शाळेतील शिक्षक,विद्यार्थी व सर्व ग्रामस्थ यांचे जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आदरणीय प्रकाश पोळ व कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे साहेब,जामखेड बीट विस्तार अधिकारी तथा राजुरी केंद्रप्रमुख सुरेश मोहिते, विस्ताराधिकारी सुनील जाधव ,संजय नरवडे,सर्व केंद्रप्रमुख व गट साधन व्यक्ती जामखेड ने हार्दिक अभिनंदन करत भविष्यातील उज्ज्वल शैक्षणिक वाटचाली करिता मनस्वी शुभेच्छा दिल्या.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे