राजकिय
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी घेतले श्री साईबाबांचे दर्शन

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी घेतले श्री साईबाबांचे दर्शन
शिर्डी, दि.२९ (प्रतिनिधी) राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज (२९ एप्रिल) शिर्डी येथील श्री साईबाबा मंदिरात जाऊन श्री.साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांच्या हस्ते श्री.साईबाबांची आरती करण्यात आली.
श्री.साईबाबा समाधीचे दर्शन घेतल्यानंतर श्री.साईबाबा मंदिरात संस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी आमदार लहू कानडे,आमदार सुधीर तांबे, विश्वस्त सर्वश्री अॅड.सुहास आहेर, अविनाश दंडवते, सचिन गुजर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव आदी उपस्थित होते.