धार्मिक

अहमदनगर फटाका असो. चे वतीने जैन श्रावक संघ, वडगावशेरी यांना देणगी अहमदनगरची कन्या साध्वी श्रेयलश्रीजी ना युवा रत्न तपस्विनी ने अलंकृत द्वारा डॉ.आचार्य शिवमुनी

अहमदनगर (प्रतिनिधी)
राष्ट्रसंत पूज्य भगवंत आचार्य सम्राट आनंदऋषीजी म. सा. च्या कृपा आशीर्वादाने वडगावशेरी पुणे येथे महाराष्ट्र प्रवर्तिनी डॉ. पू. श्री. ज्ञानप्रभाजी म. सा. ची सुशिष्या पू. साध्वी. श्री. श्रेयलश्रीजी म. सा. ची ३० दिवस निरंकार उपवासाची पचकावणी (संकल्पपूर्ती ) मोठ्या दिमाखदार उत्साह व आनंदमय वातावरणात पार पडली ह्या प्रसंगी आचार्य भगवंत शिवमुनीजी म. सा. ने लहान वयात केलेल्या या तपाचे अभिनंदन करून त्यांना युवा तपस्वीरत्न पदवी ने अलंंकृत केले त्यावेळी उपस्थित सर्व भक्तगणांनी त्याचा आनंदाने जयकाराचा घोष करून सर्व सभाचे वातावरण धर्ममय करून टाकले त्यावेळी देशभरातून जैन साधू व साध्वी चे अभिनंदन पत्र आले होते त्या सर्वांची नावे साध्वी पू. सुप्रियाजी म. सा. ने वाचन केले. सदर पू. साध्वी या नगर येथील संतोष कनकमल बोरा (फटाका असोसिएशन सेक्रेटरी) ह्यांची एकमात्र कन्या असून त्यांची पाली येथे दहा वर्षांपूर्वी दीक्षा झाली होती. प्रवर्तनी पू. ज्ञानप्रभाजी म. सा. यांच्यासारख्या ध्यानयोगिनी गुरुणीजी मिळाल्या त्यामुळे बोरा परिवाराने जीनशासनला एकुलती एक कन्या सुपूर्त केल्याचे सार्थक झाले त्यामुळे बोरा परिवाराचा साध्वीजीने जीनशासन मध्ये गौरव वाढविला.ह्या प्रसंगी पूज्य साध्वी श्रेयलश्रीजी ना अशोक (बाबुशेठ ) बोरा जैन कॉन्फरन्स राष्ट्रीय प्रमुख मार्गदर्शक व संतोष बोरा ह्यांनी युवातपस्विनीला सन्मानपत्र देऊन अभिनंदन केले.
गौतम प्रसादिची व्यवस्था संतोष बोरा यांच्या भगिनी नगर येथील उद्योगपती सौ. जोशना अशोक गुगळे( लोहसरकर )यांच्या सौजन्याने होती. दुपारी भक्तीसंगीताचा कार्यक्रम श्री. संतोष आनंद बोरा व त्यांच्या १९ भगिनींमार्फत ठेवलेली होती ह्या तपा प्रित्यर्थ साध्वी सुप्रियाजी म. सा. नी तप नाहीतर दान ह्या माध्यमातून समाज उपयोगी दान करावे असे आव्हाहन केले त्यासाठी पुणे येथील भामाशाह रमणलालजी लुंकड ह्यांनी फार मोठ्या स्वरुपाची दानराशी जाहीर केली त्याच प्रमाणे फटाका असोसिएशन तर्फे रुपये पाच हजार एकशे अकरा दान म्हणून जाहीर करण्यात आले तसेच उपस्थितांमधून अनेकांनी दानराशी जाहीर केली ह्या कार्यक्रमासाठी अहमदनगर येथून अशोक बाबुशेठ बोरा (वरिष्ठ मार्गदर्शक जैन कॉन्फरन्स, दिल्ली) अनिल पोखरणा (संचालक मर्चंट बँक) राजेंद्र बोथरा (संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती)p श्रीनिवास बोज्जा (अध्यक्ष फटाका असोसिएशन )तसेच फटाका असोसिएशनचे पदाधिकारी सुरेश जाधव, अरविंद साठे ,सागर हरबा, सुनील गांधी ,संजय सुराणा, जयप्रकाश भोगावत, प्रदीप कोठारी ,विजय मुनोत वगैरे , त्याचप्रमाणे पुणे, इचलकरंजी. पाली. इंदोर. नाशिक, मालेगाव, चेन्नई ,बेंगलोर येथून अनेक भक्तगण संपूर्ण भारतातून अनुमोदना देण्यासाठी उपस्थित होते . श्रीनिवास बोजा यांनी जैन समाजातील साधना व उपवास याबाबत आपले मनोगत व्यक्त केले त्यांनी केलेल्या विश्लेषणा चे अनेकांनी कौतुक केले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे