
कर्जत प्रतिनिधी : दि ७ मार्च
कर्जत तालुक्यातील एक ही लाभार्थी धान्यापासून वंचित राहणार नाही. इ पॉस मशीनच्या तांत्रिक प्रश्न दोन दिवसांपासून मार्गी लागला आहे त्यामुळे राहिलेले धान्य रेशन केंद्रावर घेऊन जावे असे आवाहन नायब तहसीलदार प्रकाश बुरुंगले यांनी केले आहे.
मागील पंधरा दिवसापासून सर्व रेशन धान्य दुकानावर इ पॉस मशिनच्या समस्येमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा मनस्ताप घडला होता. धान्य घेण्यासाठी लाभार्थीना भल्या पहाटे रेशन केंद्रावर यावे लागत होते. काही मिनिटंच इ पॉस मशिनला रेंज उपलब्ध होत होती. त्यांनतर पुन्हा समस्या उभी राहत असल्याने सर्वसामान्य लाभार्थी आणि रेशन केंद्रचालक यांच्यामध्ये वादाचे प्रसंग उभे राहत होते. मात्र यावर कर्जत पुरवठा विभागाने वरिष्ठांशी चर्चा करीत त्यावर मार्ग काढला असून मागील दोन दिवसांपासून पॉस मशीनचा प्रश्न सुटला असून पूर्ववत झाला आहे. त्यामुळे लाभार्थ्याना त्यांचे राहिलेले धान्य मिळणार असल्याचे नायब तहसीलदार बुरुंगले यांनी सांगितले.