राज्य युवा ग्रामीण पत्रकार संघाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर, जिल्हा अध्यक्षपदी महेश भोसले तर जिल्हा सचिवपदी बाळकृष्ण भोसले

अहमदनगर दि 23 ऑक्टोबर (प्रतिनिधी )- महाराष्ट्र राज्य युवा ग्रामीण पत्रकार संघाची अहमदनगर जिल्हा कार्यकारिणी जाहीर झाली असून जिल्हाध्यक्ष पदी शहरातील पत्रकार महेश भोसले सचिवपदी बाळकृष्ण भोसले तर प्रमुख सल्लागारपदी ज्येष्ठ पत्रकार प्रभंजन कनिंगध्वज यांची निवड करण्यात आली आहे.
अहमदनगर येथे नाशिक विभाग अध्यक्ष शरद तांबे पा. यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नवीन पदाधिकारी यांची निवड करण्यात आली जिल्हाध्यक्ष पदाची सूचना प्रभंजन कनिंगध्वज यांनी मांडली त्याला सर्वानुमते मंजूरी देण्यात आली महेश भोसले पत्रकांच्या प्रश्नी सतत कार्यरत असतात तर जनसामान्यांच्या विविध समस्यांना त्यांनी नेहमीच अग्रक्रम दिला आहे. तर राहुरी येथील पत्रकार बाळकृष्ण भोसले हे प्रदिर्घ काळ पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत असून त्यांना पत्रकारीतेतील विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे तर प्रभंजन कनिंगध्वज यांनी विविध वृत्तपत्रात मोठी जबाबदारी सांभाळत जिल्ह्यात पत्रकारांचे मोठे जाळे तयार केले आहे.
शरद तांबे पा. यांनी नूतन पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देत अभिनंदन केले.