कौतुकास्पद
शेअर मार्केटच्या नावाखाली लाखोंचा गंडा घालणारे दोन आरोपी शेवगाव पोलीसांनी केले गजाआड!


सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर सुनिल पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव विभाग यांनी तपासाची चक्रे फिरवुन तपास पथक तयार करण्यात आले होते.
सदर ठिकाणी तपास पथकाने आरोपीची पाहणी केली असता नमुद गुन्ह्यातील आरोपीला पोलीसांची चाहुल लागल्याने सदरचे आरोपी पळुन जात असतांना शेवगाव पोलीस स्टेशन येथील तपास पथकाने सदर आरोपीला गदेवाडी व बोधेगाव येथुन ताब्यात घेवुन नमुद गुन्ह्यात आरोपीला अटक करण्यात आली आहे. सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक राकेश ओला अहमदनगर,अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे अहमदनगर, मा. उपविभागिय पोलीस अधिकारी सुनिल पाटील उपविभाग शेवगांव यांचे मार्गदर्शनाखाली शेवगावचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल बागुल,पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार, पोहेकॉ परशुराम नाकाडे, पोकॉ शाम गुंजाळ, पोकों बाप्पासाहेब धाकतोडे, पोकों संतोष वाघ, पोकों संपत खेडकर, पोकाँ एकनाथ गरकळ, पोकाँ राहुल खेडकर यांनी केली असुन पुढील तपास पोसई अमोल पवार हे करत आहेत.