ब्रेकिंग

गावठी कट्टा बाळगणारा आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या! आरोपीकडून 1 गावठी कट्टा व 02 जिवंत काडतुस हस्तगत!

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : दि. 9 जुलै: अहिल्यानगर (प्रतिनिधी) मा.श्री.सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस जिल्ह्यामध्ये अवैध अग्निशस्त्रे व हत्यारे बाळगणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानुषंगाने प्रभारी अधिकारी स्थानिक गुन्हे शाखा यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोउनि/तुषार धाकराव व पोलीस अंमलदार बापुसाहेब फोलाणे, मनोहर गोसावी, भगवान थोरात, रमीजराजा आत्तार, सुनिल मालणकर व महादेव भांड यांचे पथक तयार करुन अवैध व्यावसायिकांची व अवैध अग्निशस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत पथकास मार्गदर्शन करुन पथक रवाना केले.
दिनांक 08/07/2025 रोजी पथक लोणी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध धंदयाची माहिती काढत असतांना पथकास गोपनीय माहिती मिळाली की, इसम  अक्षय राजेंद्र पायमोडे, रा.प्रवरानगर, लोणी, ता.राहाता हा व त्याचा साथीदार यांचेकडे गावठी कट्टा असून ते कट्टयाची विक्री करण्यासाठी कोल्हार भगवतीपूर गावात बेलापूर रोड कुंकलोळ कॉम्प्लेक्स, ता.राहाता येथे थांबलेले आहेत.पथकाने पंचासमक्ष मिळालेल्या माहितीतील ठिकाणी संशयीत इसमांचा शोध घेऊन दोन संशयीत मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेत असताना एक इसम पळून गेला.पथकाने घटनाठिकाणावरून 1) अक्षय राजेंद्र पायमोडे, वय 26, रा.प्रवरानगर, लोणी, ता.राहाता, जि.अहिल्यानगर यास ताब्यात घेतले.ताब्यातील आरोपीकडे पळून गेलेल्या इसमाचे नाव विचारले त्याने त्याचे नाव 2) अनिकेत देवेंद्र भोसले, रा.प्रवरानगर, लोणी, ता.राहाता, जि.अहिल्यानगर (फरार) असे असल्याचे सांगीतले.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीची पंचासमक्ष झडती घेऊन त्याचेकडून 49,000/- रू किंमतीचे एक गावठी पिस्टल, 2000/- रू किं. दोन जिवंत काडतुस, 10,000/- रू किं.त्यात एक मोबाईल असा एकुण 61,000/- रू.किं.मुद्देमाल जप्त करण्यात आला.वर नमूद आरोपीविरूध्द लोणी पोलीस स्टेशन गुरनं 418/2025 भारतीय हत्यार कायदा कलम 3/25, 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ताब्यातील आरोपीस मुद्देमालासह लोणी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास लोणी पोलीस स्टेशन हे करीत आहे.
सदर कारवाई मा.श्री.सोमनाथ घार्गे,पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, मा.श्री.बसवराज शिवपुजे उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे