विशेष प्रशासकीय

27 मार्च ते 2 एप्रिल, 2022 दरम्यान तृतीय* *पंथीय मतदार नाव नोंदणीसाठी विशेष शिबिर

आंतरराष्ट्रीय तृतीयपंथी ओळख दिनाच्या निमित्ताने

अहमदनगर दि. 26 (प्रतिनिधी) – 31 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय तृतीय पंथी ओळख दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. या निमित्ताने अहमदनगर जिल्‍ह्यात 27 मार्च ते 2 एप्रिल, 2022 हा “तृतीय पंथीयांच्या मतदार नोंदणीचा विशेष सप्ताह” म्हणून साजरा करण्याचा निर्णय जिल्‍हा निवडणूक विभागाने घेतला आहे.
यापूर्वी नोव्हेंबर, 2020 मधील विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत तृतीय पंथीयांच्या नाव नोंदणीसाठी राबवलेल्या विशेष मोहिमेमुळे मतदार यादीतील त्यांची टक्केवारी वाढली असली, तरी लोकसंख्येतील पात्र सर्व तृतीयपंथी नागरिकांची नोंदणी करण्याचा लक्ष्यांक आहे. तरी, तृतीय पंथी ओळख दिनाच्या निमित्ताने त्यांच्या नाव नोंदणीसाठी प्रयत्न केल्यास ही लक्ष्यापूर्ती करण्यास हातभार लागू शकणार आहे. या मोहिमेद्वारे जिल्हयातील तृतीय पंथीयांची संख्या अधिक असणारी ठिकांणे यांचा शोध घेऊन, वरील सप्ताहामध्ये त्या ठिकाणी, एका दिवशी तृतीय पंथीय मतदार नाव नोंदणीसाठी विशेष शिबीर आयोजित करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील तृतीय पंथीयांसाठी कार्य करणाऱ्या सामाजिक संस्था, व्यक्ती यांनी राबवण्यात येणाऱ्या विशेष मतदार नोंदणी शिबिरास सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. या शिबिरात पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्यात येणार आहे.
तृतीय पंथीयांचे नाव नोंदणीचे अर्ज भरून घेताना, भारत निवडणूक आयोगाने तृतीय पंथीयांसाठी दिलेल्या सवलतींबाबत त्यांना अवगत करण्यात येईल. त्यांच्याकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन घेण्यात येणार आहे. आयोगाच्या निदेशांनुसार, तृतीय पंथीयांच्या मतदार नाव नोंदणीसाठी त्यांच्या वैदयकीय प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. या विशेष शिबिरांव्दारे मतदार म्हणून नोंदविलेल्या तृतीय पंथीयांची आकडेवारी निवडणूक विभागाकडे सादर करण्यात येणार आहे. या मोहिमेचा लाभ घ्यावा आणि तृतीयपंथी मतदारांनी आपले नांव मतदार यादीमधे नोंदवावे असे आवाहन निवडणूक उपजिल्हाधिकारी, अहमदनगर यांनी केले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे