देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क अहिल्यानगर : दि. 19 डिसेंबर: नीलक्रांती चौक गौतमनगर येथील फुले शाहू आंबेडकर साठे चळवळीतील युवा नेते विक्रम शिंदे (वय 48) यांचे काल दि. 18 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी,आई, भाऊ, बहिणी, मेहुणे, नातेवाईक तसेच कार्यकर्ते, मित्र असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनाने, शहरातील आंबेडकरी चळवळीमध्ये व नीलक्रांती चौक गौतमनगर परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचा अंत्यविधी आज दुपारी एक वाजता मालेगाव येथील अमरधाम येथे होणार आहे.
विक्रम शिंदे यांना आंबेडकरी चळवळीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा