महाराष्ट्रात गाजलेली जामखेडची नागपंचमी आनंद नगरीचा ठेका, ऑन कॅमेरा जाहीर लिलाव न करता मनमानी जामखेड येथे अभिजीत राळेभात , संतोष गव्हाळे यांचे तहसील कार्यालय समोर उपोषण

जामखेड दि. 7 ऑगस्ट (प्रतिनिधी :रोहित राजगुरू )
राज्यभर प्रसिद्ध असणारी जामखेड येथील नागपंचमी ही ग्रामदैवत श्री नागेश्वर यात्रेनिमित्त आनंद नगरी भरविण्यात येते.
कृषी उत्पन्न बाजार समिती जामखेड यांच्या मालकीच्या जागेमध्ये दरवर्षीप्रमाणे आनंद नगरी भरते सदर जागेचा ऑन कॅमेरा लिलाव होत होता परंतु असे न करता ठेकेदाराला जागा जाहीर लिलाव न करता देण्यात आली. यावर्षी या जागेचा जाहीर लिलाव केलेला नसून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव, सभापती व संचालक मंडळ यांनी लिलाव न करता सदर जागा एका ठेकेदाराला दिली असे तोंडी सांगत आहेत यामध्ये मोठा आर्थिक भ्रष्टाचार झाल्याची शक्यता वाटते त्यामुळे सदर जागेचा जाहीर लिलाव व्हावा अन्यथा आनंद नगरी भरू नये याबाबत योग्य निर्णय न झाल्यास आज रोजी जूने तहसील कार्यालय समोर दि.०६/०८/२०२४ रोजी उपोषण करण्यात आले.
उपोषणकर्ते अभिजीत गंगाधर राळेभात, संतोष बबन गव्हाळे यांनी
उपोषण केले आहे.या उपोषणासाठी शहरासह तालुक्यातील नागरिकांनी पाठिंबा दर्शविला आहे.
यावेळी मनसेचे प्रदीप टाफरे, शिवसेनेचे प्रा.कैलास माने सर,
राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा युवक अध्यक्ष विकास मासाळ,
सागर सदाफुले,प्राचार्य विकी घायतडक, प्रविण राळेभात,मोहन चव्हाण,माजी सरपंच गफ्फारभाई पठाण, बबन गव्हाळे,ॲड.बाळासाहेब घोडेस्वार,बापूसाहेब कार्ले, विक्रांत डाडर,अजिनाथ शिंदे,सुरज पवार, युवराज डाडर,तुषार समुद्र, तुषार शिरोळे, प्रमोद गव्हाळे, सोनू वाघमारे, शिवम घायतडक,सचिन गायकवाड,तुषार बोथरा,रोहन लोंढे, प्रकाश मुरुमकर, विकास कांबळे, प्रविण गव्हाळे,अमोल गव्हाळे,शुभम गव्हाळे आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.