अहमदनगर वाहतुक पोलीसांची सन-२०२३ या वर्षात वाहतुक नियमभंग करणारे वाहनचालकांविरुध्द विशेष कारवाई वाहतुक नियमभंग करुन वाहन चालविणारे वाहनचालकांवर कारवाई करुन एकुण ३,६१,०६,०००/- रु. दंडाची आकारनी

अहमदनगर दि.4 जानेवारी (प्रतिनिधी )
अहमदनगर जिल्हयामध्ये सन २०१९ पासुन वन स्टेट वन ई चलान प्रणाली अंतर्गत ई चलान सुरु करण्यात आलेले असुन त्याद्वारे वाहतुक नियमभंग करणारे कसुरदार वाहनचालक यांचेविरुध्द कारवाई करण्यात येत आहे. मा. श्री राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर व उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर विभाग, अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली पोनि मोरेश्वर पेंदाम यांनी शहर वाहतुक शाखा, अहमदनगर नेमणुकीतील अधिनस्त अधिकारी व अंमलदार यांचेसह शहर वाहतुक शाखा, अहमदनगर हद्दीमध्ये ५८२६९ वाहतुक नियमभंग करुन वाहन चालविणारे वाहनचालकांवर कारवाई करुन एकुण ३,६१,०६,०००/- रु. दंडाची आकारणी करण्यात आलो.
त्याचप्रमाणे संपूर्ण अहमदनगर जिल्हयामध्ये वाहतुक नियमभंग करुन वाहन चालविणारे एकूण १५२००० कसुरदार वाहनचालकांवर कारवाई करुन एकूण १०,२७,७६,०००/- दंडाची आकारणी करण्यात आली.
त्यामध्ये प्रामुख्याने बिना हेल्मेट दुचाकी चालविणारे, बिना सिटबेल्ट, मोबाईल टॉकींग, धोकादायकरित्या माल वाहतुक करणे, नंबरप्लेट विषयी अपराध, काळी काच, वाहतुकीस अडथळा, ट्रिपल सिट या सदराखाली मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली आहे. तसेच शहर वाहतुक शाखा, अहमदनगर हद्दीमध्ये अवैध प्रवासी वाहतुक करणारे १२६ वाहन चालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली असुन त्यांचेकडुन १,२०,१००/- दंड वसुल करण्यात आला आहे. व ड्रंक अँड ड्राईव्ह वाहतुक नियमांचा भंग करणारे ८९ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असुन त्यांचेकडुन १,९४,०००/- दंड वसुल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण अहमदनगर जिल्हयामध्ये अवैध प्रवासी वाहतुक करणारे ८६६ वाहन चालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली असुन त्यांचेकडुन ८,४७,७००/- रु दंड वसुल करण्यात आला आहे. व ड्रंक अँड ड्राईव्ह वाहतुक नियमांचा भंग करणारे ७८२ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असुन त्यांचेकडुन १२,६२,४००/- दंड वसुल करण्यात आला आहे.