राजकिय

सर्व सामान्य बहुजन समाजाला न्याय देण्याचे काम रिपब्लिकन सेना करत आहे : सुनील शिंदे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे विलास गजभिव यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा रिपब्लिकन सेनेत प्रवेश पाथर्डी तालुक्याची कार्यकारिणी जाहीर

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : पाथर्डी : दि : 9 ऑगस्ट : सर्व सामान्य बहुजन समाजाला अनेक प्रश्नावर न्याय देण्याचे काम रिपब्लिकन सेना करत असल्याचे मत रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष सुनील शिंदे यांनी पाथर्डी येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत व्यक्त केले.यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष विलास गजभिव यांच्या सह अनेक कार्यकर्त्यांना रिपब्लिकन सेनेत प्रवेश केला. बैठकीस जिल्हा प्रसिद्धीप्रमुख महेश भोसले, संजय ताकवले पत्रकार पाथर्डी येथील पत्रकार राजेंद्र सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलतांना शिंदे म्हणाले अहिल्यानगर जिल्ह्यात बहुजन समाजाचे खूप गंभीर प्रश्न आहेत. शासकीय अधिकारी गेंड्याच्या कातडीची झाली आहेत. त्यांना लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी वेळ नाही, रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली बहुजन समाजाच्या प्रश्न कसे सोडविता येतील याबाबत आम्ही प्रयत्नशील आहोत. अन्याय अत्याचारा विरुद्ध मोठा लढा उभारण्यासाठी रिपब्लिकन सेनेत सामील होण्याचे आवाहन त्यांनी बैठकीत केले. यावेळी पाथर्डी तालुक्याची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
*रिपब्लिकन सेना पाथर्डी तालुका कार्यकारिणी*
1) विलास गजभिव : पाथर्डी तालुका अध्यक्ष
2) रामदास माळी : तालुका उपाध्यक्ष
3)मिलिंद सोनवणे :तालुका संघटक
4)रमेश औताडे : तालुका सचिव
5)लक्ष्मण काळोखे : पाथर्डी शहर अध्यक्ष
6) कविता सोनवणे : महिला तालुका अध्यक्षा
7)पुष्पा आल्हाट : महिला तालुका कार्याध्यक्षा बैठकीचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन नूतन तालुका अध्यक्ष विलास गजभिव यांनी केले, तर आभार प्रदर्शन मिलिंद सोनवणे यांनी केले.यावेळी सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे