दोन स्विफ्ट डिझायर कार चोरी करणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद!

अहमदनगर दि.७ जुलै (प्रतिनिधी)
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, दिनांक 06/06/23 रोजी फिर्यादी श्री. प्रविण अशोक राहिंज, वय 32, रा. मंगलगेट, जे.जे. गल्ली, अहमदनगर यांची सीटीप्राईड हॉटेल, एकविरा चौक, अहमदनगर येथे लावलेली 1,00,000/- रुपये किंमतीची स्विफ्ट डिझायर कार अनोळखी आरोपींनी चोरुन नेली होती. सदर घटने बाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी वरुन तोफखाना पोलीस स्टेशन गु.र.नं. 828/2023 भादविक 379 प्रमाणे कार चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना ना उघड चोरीचे गुन्हे उघडकिस आणणे बाबत आदेश दिले होते.
नमुद आदेशा प्रमाणे पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई/सोपान गोरे, पोहेकॉ/मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, देवेंद्र शेलार, संदीप पवार, पोना/रविंद्र कर्डीले, गणेश भिंगारदे, संतोष लोढे, फुरकान शेख, पोकॉ/बाळासाहेब गुंजाळ, किशोर शिरसाठ, मेघराज कोल्हे अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुण ना उघड चोरीचे गुन्हे उघडकिस आणणे बाबत सुचना देवुन पथकास तात्काळ रवाना केले. पथक नगर शहर परिसरात फिरुन आरोपींची माहिती घेताना पोनि/श्री. दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, वर नमुद गुन्हा हा आरोपी समीर शेख, रा. जालना याने केला असुन तो जालना येथे आहे आता गेल्यास मिळुन येईल. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळवुन, पंचाना सोबत घेवुन जालना जिल्ह्यात जावुन आरोपीचे ठावठिकाणाबाबत माहिती घ्यावी व खात्री करुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्या.
पथकाने लागलीच जालना जिल्ह्यात जावुन आरोपी नामे समीर शेख याचे वास्तव्याबाबत माहिती घेवुन तो मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या इसमास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव 1) समीर कादीर शेख, वय 25, रा. वॉर्ड नं. 10, संजयनगर, देऊळगांवराजा, जिल्हा बुलढाणा हल्ली रा. जिल्हा जालना असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे वर नमुद गुन्ह्याबाबत विचारपुस करता त्याने त्याचा साथीदार नामे 2) नदीम दाऊद शेख रा. नद्रा घाट, दुधा, जिल्हा बुलढाणा हल्ली रा. निदाणा रोड, जिल्हा जालना (फरार) अशा दोघांनी मिळुन अहमदनगर व लासलगांव, जिल्हा नाशिक येथे कार चोरी करुन दोन्ही कार साथीदाराचे घरा जवळ लावल्या आहे. अशी कबुली दिल्याने आरोपीचा साथीदार नामे नदीम शेख रा. निदाणा रोड, जिल्हा जालना याचे घराजवळ जावुन पाहणी करता दोन स्विफ्ट कार मिळुन आल्याने आरोपी समीर कादीर शेख यास मुद्देमालासह ताब्यात घेतले.
ताब्यातील आरोपीने दिलेल्या कबुलीच्या अनुषंगाने लासलगांव, जिल्हा नाशिक गुन्हे अभिलेख पडताळणी करता
लासलगांव पोलीस स्टेशन गु.र.नं. 118/2023 भादविक 379 प्रमाणे गुन्हा दाखल असले बाबत माहिती प्राप्त झाली.
ताब्यातील आरोपी नामे समीर कादीर शेख यास 5,00,000/- रुपये किंमतीच्या दोन स्विफ्ट डिझायर कारसह ताब्यात घेवुन तोफखाना पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन करीत आहे. ताब्यातील आरोपीचे साथीदाराचा शोध घेतला परंतु तो मिळुन आला नाही.
सदर कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर व मा. श्री. अनिल कातकाडे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.