देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क :अहिल्यानगर, दि. 20 जानेवारी: (प्रतिनिधी)- भिंगार येथील भीमनगर परिसरात आंबेडकरी समाजाची संघटित व निर्णायक ताकद पुन्हा एकदा प्रभावीपणे समोर आली. प्रभाग क्रमांक १३ मधून प्रचंड बहुमताने विजयी होऊन अहिल्यानगर महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवड झाल्याबद्दल आंबेडकरी समाजाचे युवा नेतृत्व नगरसेवक सुरेश भाऊ बनसोडे यांचा भव्य नागरी सत्कार व पेढेतुला सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी कार्यक्रमाचे आयोजक भाऊ भिंगारदिवे,सिद्धार्थआढाव,नामदे लंगोटे,एकनाथ जाधव,प्रदीप भिंगारदिवे,अक्षय भिंगारदिवे,फ्रॅंकलीन शेक्स्पियर,दादा आल्हाट,शंकर गारुडकर,सुनील भिंगारदिवे, अक्षय गायकवाड,सृजन भिंगारदिवे आदीसह परिसरातील नागरिक, समाजबांधव व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसरात जल्लोषाचे वातावरण असून, ढोल-ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत हा सोहळा पार पडला.
कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, सुरेश भाऊ बनसोडे हे केवळ नगरसेवक नसून सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून लढणारे आणि भविष्यातील सत्ताकेंद्र ठरणारे नेतृत्व आहेत. जनतेने दिलेला कौल ही त्यांच्या कार्याचीच पावती आहे.
विशेष बाब म्हणजे, नगरसेवक सुरेश भाऊ बनसोडे हे आमदार संग्राम जगताप यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. या भव्य सत्कारानंतर राजकीय वर्तुळात त्यांच्याकडे महापौर पदाचे संभाव्य दावेदार म्हणून गांभीर्याने पाहिले जात असून, तशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
भीमनगरमधून उभा राहिलेला हा आंबेडकरी समाजाचा बुलंद आवाज आता थेट अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सत्ताकेंद्रात पोहोचताना दिसत आहे. आगामी काळात नगरसेवक सुरेश बनसोडे यांची भूमिका अधिक निर्णायक ठरणार असल्याची भावना देखील नागरिकांनी व्यक्त केली.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा