मारहाण प्रकरणी तक्रारदाराने घेतली जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट !
कारवाई करण्याची मागणी,कारवाई न झाल्यास करणार उपोषण!

अहमदनगर दि.२८ (प्रतिनिधी)
बेलवंडी पोलीस स्टेशन मधील मारहाण प्रकरणी तक्रारदार यांनी घेतली जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट कारवाई करण्याची मागणी,कारवाई न झाल्यास,दि.१० मार्च रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात आमरण उपोषणाचा निवेदनाद्वारे इशारा दिला आहे.याबाबतची सविस्तर माहिती अशी की,
श्री.नवनाथ बबन मोरे राहणार एरंडोली म्हसोबा मळा,तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर यांनी मा.पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मी वरील ठिकाणचा रहिवासी असून सन २०११ पासून पोलीस मित्र म्हणून काम करतो दि.७/२/२०२२ रोजी माझा सख्खा भाऊ छगन बबन मोरे यांच्याशी माझी शेळी चारण्या वरुन शाब्दिक भांडण झाली. त्याचा राग येऊन माझ्या भावाने त्याच दिवशी सायंकाळी ६.४० मिनिटांनी एन.सी. नंबर ११९/२०२२ रोजी बेलवंडी पोलीस स्टेशन दाखल केली,त्यामुळे बेलवंडी पोलीस स्टेशनचे पीआय यांनी दि.८/२/२०२२ रोजी मला ४ वाजता फोन केला व मला पोलीस स्टेशनला बोलवले फोन आला त्यावेळेस मी कामावर होतो मी त्यांना म्हणालो की मला येण्यास थोडा वेळ लागेल त्यांनी मला फोनवरच दमदाटी ची भाषा सुरू केली व म्हणाले तू काय लय माजला काय? लगेच आला पाहिजे असे म्हणून फोन कट केला.त्यामुळे मी बेलवंडी पोलीस स्टेशन मधले पूर्ववत पोलीस निरीक्षक नारायण वाखारे यांना फोन लावून सांगितले की माझ्या व माझ्या भावाचे घरगुती भांडण झाले आहे. माझ्या भावाने माझ्याविरुद्ध एनसी दाखल केली आहे. मला पीआय.दुधाळ साहेबांचा फोन आला होता व पोलीस स्टेशनला ये सांगितले मी कामावर आहे मला एक तासभर उशीर लागेल त्याबद्दल तुम्ही पिआय.दुधाळ साहेबांना सांगा असे सांगितले ते मला म्हणाले की हातातले काम सोडून लगेच जा मी माझी आई व माझी पत्नी असे तिघेजण आम्ही साधारण पोलीस स्टेशनला ७ वाजता गेलो बेलवंडी पोलीस स्टेशनच्या बाहेरच दुधाळ साहेब हे उभे होते. त्यांनी माझी कुठलीही चौकशी न करता तू खूप माजला आहे. असे म्हणून मला मारहाण करायला सुरुवात केली व म्हणाले की याला आत घ्या व वाखारे काय माझा बाप आहेत काय? त्याला फोन करून सांगतो काय तुला दाखवतो असे म्हणून मला आत नेले व माझे पूर्णपणे कपडे काढले माझे आई व पत्नीला बोलावून घेतले तसेच पोलीस निरीक्षक दुधाळ व ४ पोलीस कर्मचारी यांनी मला माझ्या आई व पत्नी समोरच मारायला सुरुवात केली,मला खाली पाडून माझ्या मांड्यावर बसले माझे पाय दाबून धरले व तळपायावर व तळहातावर बेल्ट व काठीने जोरदार मारहाण केली बेलवंडी पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक व कर्मचारी यांनी कारण नसताना मला बेदम मारहाण केली या मारहाणीचा सखोल तपास करून दोषींवर कारवाई करण्यात यावी व मला न्याय मिळवून देण्यात यावा अशी पोलिस अधीक्षकांकडे दि.११/२/२०२२ रोजी निवेदनाद्वारे मागणी केली होती.अदखलपात्र गुन्हयात बेलवंडी पोलीस स्टेशन मध्ये बोलवून मारहाण केली बाबत तक्रारदार नवनाथ मोरे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात दि.११/०२/२०२२ रोजी अर्ज दिला होता परंतु या अर्जावर अद्याप पर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही त्यामुळे तक्रारदार यांनी दि.१०/३/२०२२ रोजी पोलीस अधिक्षक कार्यालयात आमरण उपोषण करणार असल्याचे २८/०२/२०२२ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात दिलेल्या निवेदनाद्वारे म्हटले आहे.