ब्रेकिंगसामाजिक

उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री यांच्या शुभहस्ते व पालकमंत्री नामदार विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली 27 जुलै रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळयाचे अनावरण होणार :आमदार संग्राम जगताप

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर : दि. 20 जुलै : रविवार दिनांक 27 जुलै 2025 महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण राज्याचे लोकप्रिय नेते उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री यांच्या शुभहस्ते व अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी प्रसार माध्यमाना दिली.
यावेळी बोलतांना ते म्हणाले विश्व्रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा शहरात असावा हि आपल्या सर्वांची इच्छा होती. त्यासाठी बऱ्याच वर्ष संघर्ष केला गेला. आणि हा पुतळा एप्रिल महिन्यात तयार झाला. या पुतळ्याचा अनावरण सोहळा आमच्या सारख्या आंबेडकरी चळवळी काम करणाऱ्या शेकडो माता भगिनी, कार्यकर्त्यांच्या होणार असल्याचा आनंद निश्चितच आहे. या पुतळ्यासाठी महानगर पालिकेकडून जवळपास 85 लक्ष रुपये खर्च केले आहेत. प्रत्येकाच्या मनामध्ये ऊर्जा निर्माण करणारा व येणाऱ्या पिढीला दिशा देणारा हा पुतळा असून 27 जुलै रोजी होणाऱ्या या ऐतिहासिक सोहळ्यास अहिल्यानगर वासियांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी पूर्णाकृती पुतळा समितीचे सुरेश बनसोडे, अशोक गायकवाड, माजी नगरसेवक विजय गव्हाळे, संभाजी भिंगारदिवे, विजय भांबळ, प्रा. विलास साठे, माजी नगरसेवक अजय साळवे, राहुल कांबळे,प्रा. भीमराव पगारे, सुनील शिंदे, सुनील क्षेत्रे, महेश भोसले, सुमेध गायकवाड,कौशल गायकवाड,किरण दाभाडे, अमित काळे, विशाल कांबळे,संजय जगताप, पोपट जाधव, संजय ताकवले, सिद्धार्थ आढाव, विवेक विधाते, विशाल भिंगारदिवे, तसेच शिव, फुले, शाहू, आंबेडकर, साठे चळवळीत काम करणारे कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे